AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नीच्या अनैतिक संबंधांचा संशय, मुलाची हत्या करुन नरबळी भासवण्याचा प्रयत्न, कोल्हापुरात बापाचा पर्दाफाश

बालकाच्या मृतदेहाच्या शेजारी गुलाल आणि कुंकू आढळले होते. हत्या करुन नरबळी असल्याचे भासवण्याचा प्रयत्न त्याने केला होता. बापानेच मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्यादही दिली होती.

पत्नीच्या अनैतिक संबंधांचा संशय, मुलाची हत्या करुन नरबळी भासवण्याचा प्रयत्न, कोल्हापुरात बापाचा पर्दाफाश
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: Anish Bendre | Updated on: Oct 07, 2021 | 12:29 PM
Share

कोल्हापूर : कोल्हापुरात सात वर्षांचे बालक मृतावस्थेत आढळल्याच्या प्रकरणात नरबळीचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. बापानेच पोटच्या गोळ्याची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बालकाच्या मृतदेहाच्या शेजारी गुलाल आणि कुंकू आढळल्याने नरबळीची शंका उपस्थित झाली होती.

काय आहे प्रकरण?

कोल्हापूरच्या शाहुवाडी परिसरातील कापशी गावात राहणाऱ्या सात वर्षीय बालकाच्या हत्येप्रकरणी वेगळाच खुलासा झाला आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह त्याच्याच घराच्या पाठीमागे सापडला होता. बापानेच आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप होत आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधातून मुलगा झाल्याचा पतीला संशय होता. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन दोघांमध्ये वाद होते.

नरबळी भासवण्याचा प्रयत्न

बालकाच्या मृतदेहाच्या शेजारी गुलाल आणि कुंकू आढळले होते. हत्या करुन नरबळी असल्याचे भासवण्याचा प्रयत्न त्याने केला होता. बापानेच मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्यादही दिली होती. दोन दिवसांपासून चिमुकला घरातून गायब असल्याने अपहरणाची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र कोल्हापूर पोलिसांनी 24 तासात हत्या प्रकरणाचा छडा लावला.

अमावस्येच्या पूर्वसंध्येला प्रकार

बालकाच्या अंगावर गुलाल, हळदी- कुंकू टाकण्यात आलं होतं. अमावस्याच्या पूर्वसंध्येलाच असा प्रकार समोर आल्याने हा नरबळीचा प्रकार असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

अपत्य नसल्याने कागलमध्ये मित्राच्या मुलाची हत्या

दरम्यान, स्वत:ला मूल होत नाही म्हणून मित्राच्या मुलाचे अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना ऑगस्ट महिन्यात कोल्हापुरातच उघडकीस आली होती. सावर्डे बुद्रुक (ता. कागल) गावातून सात वर्षांच्या बालकाचं अपहरण झालं होतं. याबाबत वडिलांनी मुरगूड पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करत संशयित आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली.

आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

पोलिसांनी आरोपी मारुती वैद्य (वय 45) याची चौकशी केली असता त्याने शेतामध्ये मुलाची गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली होती. मुलाचा मृतदेह सावर्डे गावच्या तलावापासून 200 मीटर अंतरावरील शेतामध्ये सापडला होता. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक आणि महिलांनी प्रचंड संताप व्यक्त करत पोलिसांना घेराव घातला होता. आरोपीस बारा दिवसाच्या आत फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

आजोळला आला असताना संतापजनक प्रकार

चिमुकला आपले आजोळ सावर्डे बुद्रुक येथे घराच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी आई-वडिलांसोबत आला होता. तो मंगळवारी (17 ऑगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास बेपत्ता झाला होता. रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सर्वत्र शोध घेऊनही त्याचा शोध लागला नव्हता. भर वस्तीत असणाऱ्या गल्लीतून चिमुकला गायब कसा झाला? याबाबत तर्कवितर्क वर्तवले जात होते. या गल्लीत नेहमी नागरिकांची वर्दळ असते, अशा ठिकाणाहून तो गायब झाल्याने त्याचवेळी हे कृत्य कुणी माहितीतील व्यक्तीचे असण्याची शक्यता व्यक्त झाली होती.

संबंधित बातम्या :

मूल होत नाही म्हणून मित्राच्या मुलाचं अपहरण, नंतर निर्घृण हत्या, मृतदेह शेतात पुरला, कोल्हापूर हादरलं

दुसरं लग्न केलं, मुलगी झाली, पण पत्नीच्या चारित्र्यावर संशय, राक्षसी पतीने जे केलं ते हादरवणारं

बेपत्ता चिमुकल्याचा मृतदेह घरामागे आढळला, अंगावर हळद-कुंकू, कोल्हापुरात नरबळी?

Follow Us
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?.

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन….

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन…