AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Biyani | बिल्डर संजय बियाणींचे पार्थिव पाहताच पत्नीचा टाहो, हत्येबाबत मोठा आरोप

नांदेडमधील सुप्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांची घरासमोरच चार गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मंगळवारी सकाळी अकरा वाजता बियाणी नांदेड शहरातील शारदानगर येथील  घराबाहेर निघताना त्यांच्यावर गोळीबार झाला होता.

Sanjay Biyani | बिल्डर संजय बियाणींचे पार्थिव पाहताच पत्नीचा टाहो, हत्येबाबत मोठा आरोप
संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: Anish Bendre | Updated on: Apr 06, 2022 | 11:14 AM
Share

नांदेड : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani) यांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नीने न्याय देण्याच्या मागणीसाठी टाहो फोडला आहे. बियाणी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या नांदेडमधील घरी ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी कुटुंबीय आणि नातेवाईकांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. मंगळवारी सकाळी चार गोळ्या झाडून बियाणींची हत्या करण्यात आली होती. संजय बियाणी यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी कुटुंबासह त्यांच्या मित्र मंडळींनी केली आहे. संजय बियाणी यांच्या पत्नीने आपल्या पतीची सुपारी देऊन हत्या झाल्याचा आरोप केला आहे. गुन्हेगारांना अटक करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

काय आहे प्रकरण?

नांदेडमधील सुप्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांची घरासमोरच चार गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मंगळवारी सकाळी अकरा वाजता बियाणी नांदेड शहरातील शारदानगर येथील  घराबाहेर निघताना त्यांच्यावर गोळीबार झाला होता. दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या होत्या.  गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर नांदेडच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र उपचार सुरु असतानाच संजय बियाणी यांनी अखेरचा श्वास घेतला.

हल्ल्याची दृश्यं सीसीटीव्हीत कैद

संजय बियाणींवरील गोळीबाराचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. गाडीतून बाहेर पडलेल्या बियाणींवर दोघा जणांनी गोळीबार केल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे. बियाणी यांच्यावरील गोळीबाराचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यांच्यावर कोणी हल्ला केला, हेही अजून समजलेलं नाही. संजय बियाणींच्या हल्लेखोरांचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.

कोण होते संजय बियाणी?

नांदेडच्या नायगांव तालुक्यातील कोलंबी गावातील रहिवाशी असलेले संजय बियाणी यांनी सुरुवातीला केबल व्यवसायातून उद्योगाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी रिअल इस्टेटमध्ये पाऊल ठेवलं. नांदेडकरांना कमी किमतीत फ्लॅट देणारे बिल्डर म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. साधारणतः पंधरा वर्षांपासून ते या व्यवसायात होते. गेल्या आठवड्यातच त्यांनी आपल्या समाजातील 73 कुटुंबाना स्वस्तात घरे दिल्याने ते चांगलेच चर्चेत आले होते.

खंडणीसाठी हत्येचा संशय

संजय बियाणी हे नांदेडमधले बडे प्रस्थ असून खंडणीची वसुली किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. संजय बियाणी यांना त्यांच्या बांधकाम व्यवसायातून बऱ्यापैकी उत्पन्न मिळू लागल्याने खंडणी बहाद्दर गुंडाच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या.

संजय बियाणी यांना तीन वर्षांपूर्वी कुख्यात गुंड रिंदा याने खंडणी वसुलीसाठी धमकी दिली होती. तेव्हापासून संजय बियाणी यांना सुरक्षा देण्यात आली होती. मात्र तीन महिन्यांपूर्वीच 15 जणांची सुरक्षा काढण्यात आली होती, त्यात संजय बियाणी यांचा समावेश होता.

पाहा गोळीबाराचा सीसीटीव्ही व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Sanjay Biyani Firing CCTV | बिल्डर संजय बियाणींची हत्या, गोळीबाराचं सीसीटीव्ही फूटेज समोर

दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेले बिल्डर संजय बियाणी कोण आहेत?

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...