AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded Murder | खिचडी खाल्ल्यावरुन वाद, बाप-लेकाची तरुणाला बेदम मारहाण, नांदेडमध्ये तरुणाचा मृत्यू

खिचडीचे पार्सल घेण्यासाठी योगेश गिरी हा शिवलिंगच्या घरी आला . पण ही खिचडी खाल्ल्याच्या कारणावरून त्यांच्यात मोठा वाद सुरू झाला. यावेळी शिवलिंग गायंकी आणि त्याचा मुलगा प्रियदर्शन गायंकी या दोघांनी योगेश गिरी यास लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली

Nanded Murder | खिचडी खाल्ल्यावरुन वाद, बाप-लेकाची तरुणाला बेदम मारहाण, नांदेडमध्ये तरुणाचा मृत्यू
नांदेडमध्ये तरुणाची हत्याImage Credit source: टीव्ही9
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: Anish Bendre | Updated on: Apr 01, 2022 | 11:11 AM
Share

नांदेड : नांदेड शहरातील (Nanded Crime) शासकीय दूध डेअरी परिसरातील विणकर कॉलनीमध्ये एका युवकाची लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली. खिचडी खाल्ल्याच्या क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादानंतर पिता-पुत्राने त्याचा निर्घृण खून (Murder)  केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी आरोपी बाप लेकाला अटक केली आहे. गुरुवार (31 मार्च) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी मयत योगेश गिरीची आई शोभाबाई विलास गिरी यांच्या फिर्यादीवरून 30 मार्च रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात शिवलिंग गायंकी आणि प्रियदर्शन गायंकीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

नांदेड तालुक्यातील धनेगावजवळ असलेल्या शासकीय दूध डेअरी चौकातील विणकर कॉलनी भागात राहणारा योगेश विलास गिरी (वय 26 ) आणि शिवलिंग व्यंकटराव गायंकी (वय 45 ) हे दोघे जण देगाव, येळेगाव कारखाना ता . अर्धापूर येथे कामासाठी गेले होते. दोघे जण भोकरफाटा मार्गे घरी आले. येताना योगेश गिरी याने भोकरफाटा येथून खिचडी पार्सल घेतली , पण खिचडीचे हे पार्सल ते शिवलिंग गायकी याच्या घरी विसरले.

खिचडी खाल्ल्यावरुन वादावादी

दरम्यान शिवलिंगच्या घरच्याने ही खिचडी खाल्ली. थोड्या वेळाने खिचडीचे पार्सल घेण्यासाठी योगेश गिरी हा शिवलिंगच्या घरी आला . पण ही खिचडी खाल्ल्याच्या कारणावरून त्यांच्यात मोठा वाद सुरू झाला. यावेळी शिवलिंग गायंकी आणि त्याचा मुलगा प्रियदर्शन गायंकी या दोघांनी योगेश गिरी यास लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली, यात योगेश गिरीचा मृत्यू झाला .

या प्रकरणी मयत योगेश गिरीची आई शोभाबाई विलास गिरी यांच्या फिर्यादीवरून 30 मार्च रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात शिवलिंग गायंकी आणि प्रियदर्शन गायंकीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन्ही आरोपींना रात्री अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक माणिक हंबर्डे करत आहेत.

संबंधित बातम्या :

आधी हत्या, मग कोरड्या विहिरीत मृतदेह फेकला! अखेर मारेकऱ्यांना पोलिसांनी गाठलंच

आजेसासू, बायकोसह दोन लेकरांची हत्या, गुजरातच्या मराठी कुटुंबातील हत्येचं गूढ उकललं

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून, प्रियकराकडून निर्घृण खून, औरंगाबादच्या शफेपूरची घटना

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...