AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gujarat Murders | आजेसासू, बायकोसह दोन लेकरांची हत्या, गुजरातच्या मराठी कुटुंबातील हत्येचं गूढ उकललं

हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या 48 तासांत अहमदाबाद क्राईम ब्रांचने महिलेचा पती विनोद गायकवाडला हत्या प्रकरणातील संशयित म्हणून अटक केली आहे.

Gujarat Murders | आजेसासू, बायकोसह दोन लेकरांची हत्या, गुजरातच्या मराठी कुटुंबातील हत्येचं गूढ उकललं
आजेसासू आणि पत्नीसह दोन मुलांची हत्याImage Credit source: सोशल
| Updated on: Mar 31, 2022 | 1:45 PM
Share

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये (Ahmedabad) राहणाऱ्या मराठी कुटुंबातील चौघांच्या हत्याकांडाने गुजरातसह महाराष्ट्रातही खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी अवघ्या 48 तासांत या हत्याकांडाचा (Murder) छडा लावला आहे. क्राईम ब्रांचने संशयित विनोद मराठी उर्फ विनोद गायकवाड याला अटक केली आहे. विनोदने पत्नी, दोन अल्पवयीन मुलं आणि आजेसासूची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

काय आहे प्रकरण?

एकाच घरातून पोलिसांनी चार कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. अहमदाबादच्या ओढव भागात राहणारी महिला, तिची आजी आणि 15 आणि 17 वर्षांची दोन मुलं यांची हत्या करण्यात आली होती.

हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या 48 तासांत अहमदाबाद क्राईम ब्रांचने महिलेचा पती विनोद गायकवाडला हत्या प्रकरणातील संशयित म्हणून अटक केली आहे. हत्या करुन आधी तो अहमदाबादहून सुरत, तर तिथून इंदौरला पळून गेला होता.

ओढव भागातील दिव्यप्रभा सोसायटीतल्या एका घरातून दुर्गंधी येत होती. सोसायटीच्या काही पदाधिकाऱ्यांनी घरात डोकावण्याचा प्रयत्न केला पण घराला बाहेर कुलूप होतं. स्थानिकांनी पोलिसांना फोन करुन माहिती दिली. पोलिसांनी घराचं कुलूप तोडून प्रवेश केला असता आत वेगवेगळ्या खोल्यांमध्ये चौघांचे मृतदेह आढळला.

…म्हणून चौघांचीही हत्या

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर विनोद सारखे आपले जबाब बदलत होता, त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. हत्येचं नेमकं कारण त्याने सांगितलेलं नाही. मात्र कुठलाही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जिवंत ठेवायचा नसल्याने त्याने कुटुंबातील चौघांचीही हत्या केल्याचं सांगितलं.

आजेसासूवर आधीही हल्ला

विनोदने पत्नी, दोन अल्पवयीन मुलं आणि आजेसासूची हत्या केल्याचा आरोप आहे. आजेसासूवर त्याने याआधीही हल्ला केला होता, मात्र नातीची अवस्था पाहून आजीने याविषयी वाच्यता केली नाही. आजी आणि नात एकाच परिसरात राहत होत्या.

आर्थिक कारणावरुन भांडणं

विनोद अहमदाबादच्या ओढव भागात टेम्पो चालवायचा. गेल्या काही काळापासून त्याची आर्थिक स्थिती बरी नव्हती. त्यावरुन विनोद आणि त्याच्या पत्नीत वाद होत असत.

संबंधित बातम्या :

गुजरातमध्ये ‘मराठी’ कुटुंबाच्या हत्याकांडानं अहमदाबाद हादरलं, 4 दिवसांपासून मृतदेह सडले

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून, प्रियकराकडून निर्घृण खून, औरंगाबादच्या शफेपूरची घटना

अल्पवयीन गर्लफ्रेण्डसोबत लग्नाला विरोध, दत्तक मुलाकडून आईची हत्या

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.