Murder | अल्पवयीन गर्लफ्रेण्डसोबत लग्नाला विरोध, दत्तक मुलाकडून आईची हत्या

दत्तक घेतलेल्या मुलाने आईचा खून केल्याची हृदयद्रावक घटना गोव्यात घडली आहे. लोखंडी दांडक्याने डोक्यात वार करुन मुलाने आईची हत्या केल्याचा आरोप आहे.

Murder | अल्पवयीन गर्लफ्रेण्डसोबत लग्नाला विरोध, दत्तक मुलाकडून आईची हत्या
अहमदाबादमध्ये एकाच कुटुंबातल्या चौघांची हत्या, संशयीत आरोपी फरारImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 12:20 PM

पणजी : ज्या आईने यशोदा मातेप्रमाणे लहानपणापासून पालनपोषण केलं, आपलंसं करत माया लावली, राहण्यासाठी छत्र दिलं, त्या माऊलीचाच मुलाने खून केला. दत्तक घेतलेल्या मुलाने (Adopted Son) आईची हत्या (Mother Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लोखंडी दांडक्याने डोक्यात वार करुन मुलाने माऊलीचा जीव घेतला. गोव्यातील संवर्दम (Sanvordem Goa) भागात महिलेची हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. मुलाने आईची हत्या केल्याची कबुली दिली आहे. अल्पवयीन मुलीसोबत लग्नाला नकार दिल्याच्या रागातून मुलाने गर्लफ्रेण्डसोबतच आईची हत्या केल्याचा दावा केला जात आहे.

काय आहे प्रकरण?

दत्तक घेतलेल्या मुलाने आईचा खून केल्याची हृदयद्रावक घटना गोव्यात घडली आहे. लोखंडी दांडक्याने डोक्यात वार करुन मुलाने आईची हत्या केल्याचा आरोप आहे.

गोव्यातील संवर्दम भागात राहणाऱ्या मनिषा नाईक यांची राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. मुलगा प्रथमेश नाईकने प्रेयसीच्या मदतीने ही हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे.

अल्पवयीन गर्लफ्रेण्डसोबत लग्नाची इच्छा

प्रथमेशला अल्पवयीन गर्लफ्रेण्डसोबत लग्न करायचं होतं. मात्र आईचा या लग्नाला विरोध होता. लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रथमेशने आईची हत्या केली.

प्रेयसीचीही हत्येमध्ये साथ

लोखंडी दांडक्याने डोक्यात वार करुन प्रथमेशने आईचा जीव घेतला. या हत्या प्रकरणात अल्पवयीन प्रेयसीनेही प्रथमेशला साथ दिल्याचा दावा केला जातो.

गोव्यातील संवर्दम भागात मनिषा नाईक यांचा मृतदेह राहत्या घरी सापडला होता. या हत्या प्रकरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. आईची हत्या केल्याची कबुली दत्तकपुत्र प्रथमेश नाईक याने दिली आहे.

संबंधित बातम्या :

Wardha Crime | संपत्तीच्या हव्यासातून आईचा शेतात खून, बाप-लेकाला आजन्म कारावास

 आधी वृद्ध आईचा गळा आवळला, मग स्वतः गळफास घेतला; वाचा सांगलीत नेमकं काय घडलं ?

जन्मदात्या आईची हत्या, वडिलांवर कोयत्याने वार, जमिनीच्या वादातून इंदापुरात मुलाचा हल्ला

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.