जन्मदात्या आईची हत्या, वडिलांवर कोयत्याने वार, जमिनीच्या वादातून इंदापुरात मुलाचा हल्ला

जन्मदात्या आईची हत्या, वडिलांवर कोयत्याने वार, जमिनीच्या वादातून इंदापुरात मुलाचा हल्ला
इंदापुरात मुलाकडून आई-वडिलांवर हल्ला

पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील काझड येथे मुलाने आई-वडिलांवर धारदार कोयत्याने वार केले. यामध्ये आईचा मृत्यू झाला, तर वडील गंभीर जखमी झाले आहेत.

राहुल ढवळे

| Edited By: अनिश बेंद्रे

Jan 03, 2022 | 11:43 AM

इंदापूर : जमिनीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून करुन मुलाने वडिलांवरही जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील काझड येथे ही घटना घडली. आई-वडील मागितले तितके पैसे देत नाहीत, या कारणावरुन त्याने हा हल्ला केल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील काझड येथे मुलाने आई-वडिलांवर धारदार कोयत्याने वार केले. यामध्ये आईचा मृत्यू झाला, तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात वडील पांडुरंग बाबुराव नरुटे (वय 60 वर्ष, रा. काझड सिधोबाचीवस्ती) यांनी फिर्याद दिली आहे.

जमिनीच्या वादातून खुनी हल्ला

वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचा मुलगा अमित पांडुरंग नरुटे (वय 31 वर्ष, रा. काझड, सिधोबा वस्ती, ता इंदापूर) याने “तुम्ही जमीन वाटून देत नाही, मला मागेल तेवढे पैसे देत नाही, तुम्ही माझे आई वडील नाहीत, असं म्हणत आई आलका पांडुरंग नरुटे (वय 55 वर्ष) यांच्यावर लोखंडी धारदार कोयत्याने तोंडावर, कपाळावर, डाव्या डोळ्यावर, नाकावर वार केले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

वडिलांना लाथा बुक्क्यांने मारहाण

त्यानंतर वडील पांडुरंग नरुटे यांना खून करण्याच्या उद्देशाने लाथा बुक्क्यांने मारहाण करुन तसेच त्यांच्या हातातील लोखंडी धारदार कोयत्याने मारहाण केली. त्यामध्ये पांडुरंग नरुटे हे गंभीर जखमी झाले, यामध्ये त्यांच्या डाव्या हाताचा अंगठा तुटून पडला आहे. वालचंदनगर पोलिसांनी अमित पांडुरंग नरुटे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या :

फळ विक्रेत्यांच्या भांडणात मध्यस्थी भोवली, नाशकात 31 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

आई किचनमध्ये, पाच भावंडं टीव्ही बघण्यात गुंग, पाण्याच्या बालदीत पडून भिवंडीत चिमुकल्याचा मृत्यू

Nashik Suicide | आई मला माफ कर, सुसाईड नोट लिहित विवाहितेची आत्महत्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें