AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded Crime | पत्नीची हत्या करुन शेतात पतीची आत्महत्या, कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊल

डोक्यात कुऱ्हाडीने वार करत पतीने आपल्या पत्नीचा खून केला. त्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील बेळकोणी गावात घडली आहे.

Nanded Crime | पत्नीची हत्या करुन शेतात पतीची आत्महत्या, कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊल
नांदेडमध्ये पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्याImage Credit source: टीव्ही9
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: Anish Bendre | Updated on: Apr 06, 2022 | 8:33 AM
Share

नांदेड : पत्नीची हत्या करुन (Wife Murder) पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून आरोपीने आपल्या पत्नीचा खून केला. त्यानंतर लिंबाच्या झाडाला गळफास घेत (Husband Suicide) पतीनेही आपलं आयुष्य संपवलं. नांदेड जिल्ह्यातील बेळकोणी गावात ही घटना घडली आहे. दाम्पत्य शेतात कामासाठी गेले होते. यावेळी दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरुन वाद झाला. तेव्हा रागाच्या भरात पतीने पत्नीच्या अंगावर कुऱ्हाड (Nanded Crime) चालवली. पत्नीचा जीव गेल्यानंतर पतीनेही जवळच्या झाडावर गळफास घेत जीवनाची अखेर केली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे. मात्र दाम्पत्याचा एकाएकी अंत झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

काय आहे प्रकरण?

डोक्यात कुऱ्हाडीने वार करत पतीने आपल्या पत्नीचा खून केला. त्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील बेळकोणी गावात घडली आहे.

नेमकं काय घडलं?

रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतकरी नामदेव तोकडवाल आणि त्यांची पत्नी रंजना तोकडवाल शेतात कामसाठी गेले होते. याच दरम्यान या दाम्पत्यामध्ये कौटुंबिक कारणावरुन वाद झाला. रागाच्या भरात नामदेव तोकडवाल यांनी हातातील कुऱ्हाडीने रंजनाच्या डोक्यावर घाव घातला. याच तिचा जागीच मृत्यू झाला.

त्यानंतर बाजूच्या लिंबाच्या झाळाला गळफास घेऊन नामदेव यांनी आत्महत्या केली. या घटनेचा पंचनामा करून रामतीर्थ पोलीसानी गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या :

Pune Murder | माझ्या जवळ का येतोस, पत्नीने चापट मारली, पतीने जीव घेतला

Wardha Crime | संपत्तीच्या हव्यासातून आईचा शेतात खून, बाप-लेकाला आजन्म कारावास

कौटुंबिक वाद टोकाला, प्राध्यापक नवऱ्याकडून पत्नीची राहत्या घरी निर्घृण हत्या

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली