AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vasai | वसईतील सुरुची बाग किनारी मृतदेह सापडला, समुद्रातून वाहत आल्याचा संशय

वसईतील सुरुची बाग समुद्र किनार्‍यावर पुरुषाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. मृतदेहाच्या शेजारी आधारकार्ड सापडले आहे. त्यावर रितेश निकश आनडा असे नाव लिहिले आहे

Vasai | वसईतील सुरुची बाग किनारी मृतदेह सापडला, समुद्रातून वाहत आल्याचा संशय
शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या गर्भाशयात राहिला कॉटनचा कपडाImage Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Apr 11, 2022 | 11:45 AM
Share

वसई : मुंबई जवळच्या वसईत समुद्र किनाऱ्यावर मृतदेह (Dead Body) आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरुची बाग समुद्र किनार्‍यावर पुरुषाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. मृतदेह अंदाजे 40 ते 50 वर्ष वयोगटातील असल्याचे सांगण्यात आले आहे. मृतदेहाच्या शेजारी आधारकार्ड सापडले आहे. त्यावर रितेश निकेश अनडा असे नाव लिहिल्याने हा मृतदेह त्याच व्यक्तीचा असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. समुद्रातून वाहत हा मृतदेह वसईतील (Vasai Crime) सुरुची बाग किनाऱ्यावर आल्याची प्राथमिक माहिती आहे. वसई पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मयत तरुणाची हत्या झाली (Murder) की त्याने आत्महत्या केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

वसईतील सुरुची बाग समुद्र किनार्‍यावर पुरुषाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. मृतदेहाच्या शेजारी आधारकार्ड सापडले आहे. त्यावर रितेश निकश आनडा असे नाव लिहिले असून त्याचे वय 37 वर्ष असल्याची नोंद आहे. हा मृतदेह रितेशचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

हत्या की आत्महत्या, अद्याप अस्पष्ट

समुद्रातून वाहत हा मृतदेह वसईतील सुरुची बाग किनाऱ्यावर आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वसई पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टम करण्यासाठी पाठवला आहे. तरुणाचा अपघात झाला की घातपात, हे अद्याप समजलेलं नाही. त्यामुळे तरुणाची हत्या झाली, त्याने आत्महत्या केली, की तो अपघाताने पडला, हे शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

नाशिकमध्ये पोलीस जावयाकडून सासऱ्याचा खून; हल्ल्यात सासू, पत्नी गंभीर

जळगावमध्ये दगडाने ठेचून एकाची हत्या, गेल्या पंधरवड्यातील चौथी घटना

गुजराती ड्रामा अर्टिस्ट प्राची मौर्य हत्या प्रकरणी बॉयफ्रेंडला जन्मठेपेची शिक्षा

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.