भीषण अपघात | विठ्ठल दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसला अपघात, 1 ठार, 35 जखमी, कुठे घडली घटना?

बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना दुखापत झाली. तर एकाला गंभीर जखम झाल्याने या प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे.

भीषण अपघात | विठ्ठल दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसला अपघात, 1 ठार, 35 जखमी, कुठे घडली घटना?
Image Credit source: social media
| Updated on: Jan 18, 2023 | 1:14 PM

रवी लव्हेकर, सोलापूरः पंढरपूर (Pandharpur) येथे विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकाच्या बसला भीषण अपघात (Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. विजापूरहून (Vijapur) पंढरपूरच्या दिशेने ही बस निघाली होती. चालकाचा बसच्या स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने बसला अपघात झाला. या अपघातात 1 जण ठार तर 35 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरु आहे.

कुठे घडली घटना?

विजापूरहून पंढरपूरकडे जाणाऱ्या बसला हा अपघात झाला. मंगळवेढ्याजवळ भाविकांच्या बसला हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बसचा अपघात नेमका कोणत्या स्थितीत झाला, ही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र चालकाचा ताबा सुटल्याने बस पूर्णपणे पलटी झाली.

यामुळे बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना दुखापत झाली. तर एकाला गंभीर जखम झाल्याने या प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे.