AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ED Raids : 135 कोटींचा महाघोटाळा, ईडीचा कारवाईचा धडाका, मुंबईसह छत्रपती संभाजीनगरमध्ये छापा

ED Raids in Mumbai-Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये 135 कोटींच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात ईडीची मोठी कारवाई समोर आली आहे. मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरमधील 6 निवासी, व्यावसायिक ठिकाणांवर ED ची धाड पडली. काय आहे हे प्रकरण?

ED Raids : 135 कोटींचा महाघोटाळा, ईडीचा कारवाईचा धडाका, मुंबईसह छत्रपती संभाजीनगरमध्ये छापा
ईडीचा कारवाईचा धडाका
| Updated on: Sep 18, 2026 | 12:00 PM
Share

छत्रपती संभाजीनगरमध्ये 135 कोटींच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात ईडीची मोठी कारवाई समोर आली आहे. गजानन गंगामाई इंडस्ट्रीज एलएलपी’ आणि तिच्या भागीदारांशी संबंधित मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरमधील 6 निवासी आणि व्यावसायिक ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली आहे. या कारवाईत कोट्यवधी रुपयांची BMW कार आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तसंच इंडियन बँकेच्या सिंगापूर शाखेतील सुमारे 35.71 कोटी रुपयांची मुदत ठेव गोठवण्यात आली आहे.

बँकेच्या तक्रारीनंतर CBI ने 2 जून 2023 रोजी या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर CBI च्या आरोपपत्राच्या आधारे ईडीने आर्थिक गैरव्यवहाराचा तपास सुरू केला. बँकांकडून घेतलेला कर्जनिधी ठरवून दिलेल्या व्यवसायासाठी न वापरता बनावट आणि शेल कंपन्यांच्या माध्यमातून वळवण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे. तसंच या निधीतून रोख रक्कम काढून पैशांचा मूळ स्रोत लपवण्याचा प्रयत्न झाल्याचंही ईडीने म्हटलं आहे.

बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश

दरम्यान अंमलबाजवणी संचालनालयाने चंदीगड, हैदराबाद आणि पुण्यातील बनावट कॉल सेंटरवर कारवाई केली. ईडी आणि अमेरिकन सिक्रेट सर्व्हिसकडून ही कारवाई करण्यात आली. ईडी आणि अमेरिकेतील सीक्रेट सर्व्हिसने ही कारवाई केली आहे. हैदराबाद आणि पुण्यातील चार बनावट कॉल सेंटरवर छापा टाकला आहे. तर हैदराबादमध्ये बनावट डॉलर वाटपाचं रॅकेटही आढळून आलं. पुण्यातही हाच प्रकार समोर आला.

पटियाला, पुणे आणि चंदीगडमध्ये ईडीने धडक कारवाई केल्याने सायबर गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली. पटियालामधील दोन आणि पुण्यातील एका बनावट कॉल सेंटरचा पर्दापाश झाला. ईडीने छापा घातला, तेव्हा इथे 220 जण काम करत होते. अमेरिकन नागरिकांना खोटी कारणे देत फसवण्यात येत होते. त्यांची लूट करण्यात येत होती असे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी ईडीने 66 मोबाईल, 13 लॅपटॉप, हार्ड डिस्क, इतर उपकरणं, रोकड आणि कागदपत्रे जप्त केली आहेत. डॉलर भारतीय रुपयांमध्ये रुपांतरीत करण्यासाठी कोण कोण मदत करत होते याचा तपास सुरू आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. पटियाला येथील एका घरातून कॉल सेंटर चालवल्या जात होते.

Follow Us
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं
शरद पवारांचं फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
Sharad Pawar | शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष