AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालेगावात अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन हत्या, घटनेच्या दोन आठवड्यानंतर आरोपीचा कबुलीनामा!

मालेगाव शहरातील नवा आझादनगर भागातून अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली होती. या घटनेने मालेगाव शहर हादरलं होतं. अखेर नराधम आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. (Malegaon Nashik kidnapping And Murder accused confessed to crime to the police)

मालेगावात अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन हत्या, घटनेच्या दोन आठवड्यानंतर आरोपीचा कबुलीनामा!
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jun 09, 2021 | 9:55 AM
Share

नाशिक : मालेगाव शहरातील नवा आझादनगर भागातून अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली होती. या घटनेने मालेगाव शहर हादरलं होतं. अखेर नराधम आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेच्या दोन आठवड्यानंतर खुनाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.  (Malegaon Nashik kidnapping And Murder accused confessed to crime to the police)

कुटुंबियांचा घातपाताचा संशय

अरसलान शेख सलिम हा 12 वर्षीय अल्पवयीन मुलगा 22 मे रोजी नवा आझादनगर भागातून बेपत्ता झाला होता. दोन दिवसानंतर अरसलानचा मृतदेह जाफरनगर येथील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर संशयास्पदरित्या सापडला होता. आपल्या मुलाचा घातपात करण्यात आल्याचा कुटुंबियांना संशय होता. तसा संशय त्यांनी पोलिसांजवळ व्यक्त केला होता.

आरोपीचा कबुलीनामा

आझाद नगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे फिरवली असता संशयित फैजाण अखतर या 20 वर्षीय तरुणाला पहिल्यांदा पोलिसांनी ताब्यात घेतलं. नंतर त्याची चौकशी सुरु केली असता अनैसर्गिक कृत्य करण्यासाठी मुलाचे अपहरण केले मात्र त्याने विरोध केल्याने त्याच्या डोक्यात दगड मारून खून केला व मृत्यदेह इमारतीवर नेऊन टाकल्याची कबुली आरोपीने पोलिसांनी दिली, अशी माहिती नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे.

पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली

कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. त्यानुसार संशयितास ताब्यात घेण्यात आले. पुढे पोलिसी खाक्या दाखवून त्याच्याकडून एक एक प्रश्नांची उत्तरे घेण्यात आली. अखेर अनैसर्गिक कृत्य करण्यासाठी मुलाचे अपहरण केले मात्र त्याने विरोध केल्याने त्याच्या डोक्यात दगड मारून खून केला व मृत्यदेह इमारतीवर नेऊन टाकल्याची कबुली आरोपीने पोलिसांनी दिली.

(Malegaon Nashik kidnapping And Murder accused confessed to crime to the police)

हे ही वाचा :

पैसेवाल्यांचा माज, महामारीत हायफाय लग्नाचं रिसेप्शन, कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न

सर्वसामान्यांना बोलण्यात गुंतवायचे, संधी साधून ऐवज पळवायचे, 24 लाखांचे हिरे घेऊन पळालेली टोळी अखेर जेरबंद

पतीसाठी दरवाजा उघडा ठेवला, शेजारचा नराधम गुपचूप घरात शिरला, महिलेला मारहाण करत बलात्कार

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.