पतीसाठी दरवाजा उघडा ठेवला, शेजारचा नराधम गुपचूप घरात शिरला, महिलेला मारहाण करत बलात्कार

उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील गौतम बुद्ध नगर येथे बलात्काराची एक विचित्र घटना समोर आली आहे (Neighbor youth raped women in Uttar Pradesh)

पतीसाठी दरवाजा उघडा ठेवला, शेजारचा नराधम गुपचूप घरात शिरला, महिलेला मारहाण करत बलात्कार
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 4:08 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील गौतम बुद्ध नगर येथे बलात्काराची एक विचित्र घटना समोर आली आहे. नोएडा फेस-2 येथील भंगेल परिसरात एका महिलेवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने रात्रीच्या वेळी बलात्कार केला आहे. महिला रात्री आपल्या खोलीत झोपली होती. तिचा पती घराच्या गच्चीवर झोपला होता. आपला पती खाली झोपण्यासाठी येईल, असा तिचा अंदाज होता. त्यामुळे गच्चीवरुन खाली आल्यानंतर पायऱ्यांकडे असणारा दरवाजा तिने उघडा ठेवला होता. मात्र, याच गोष्टीचा फायदा घेऊन आरोपी घरात शिरला. त्यानंतर त्याने महिलेवर बलात्कार केला (Neighbor youth raped women in Uttar Pradesh).

आरोपीला अखेर बेड्या

संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेने शेजारी राहणाऱ्या रिंकू नावाच्या व्यक्ती विरोधात बलात्काराची तक्रार केली आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाईस सुरुवात केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या (Neighbor youth raped women in Uttar Pradesh).

महिलेची जिल्हा रुग्णालयात मेडीकल टेस्ट

आरोपीने घराचा दरवाजा उघडा बघून विकृत कृत्य करण्याचा विचार केला. तो गपचूप घरात शिरला. त्याने महिलेला घाबरवण्याचा प्रयत्न केला. तसेच महिलेला त्याने मारहाणही केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर महिलेची जिल्हा रुग्णालयात मेडिकल टेस्ट करण्यात आली आहे.

याआधी मध्य प्रदेशातही अशीच काहिशी बलात्काराची घटना घडली

विशेष म्हणजे महिला अत्याचाराची ही अशी पहिलीच घटना नाही. याआधी देखील अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. गेल्या महिन्यात मध्य प्रदेशातही अशीच काहीशी घटना समोर आली होती. मध्य प्रदेशात रिवा जिल्ह्यातील मऊगंजमध्ये संबंधित घटना घडली होती. पीडित महिला आपला पती आणि दोन मुलांसोबत घरात झोपली होती. घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत आरोपी आत शिरला. रात्रीच्या अंधारात त्याने महिलेसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सुरुवात केली.

लैंगिक संबंध ठेवणारा पती असल्याचा समज

आपल्याशी लैंगिक संबंध ठेवणारा आपला पतीच आहे, असा महिलेचा गैरसमज झाला. रात्रीच्या अंधारात महिला चुकून आरोपीला आपला पतीच समजली. मात्र काही वेळात तिला तो पती नसल्याची जाणीव झाली. त्यासरशी तिने जोरात आरडाओरड करायला सुरुवात केली. महिलेच्या किंकाळ्या ऐकून पती आणि मुलांना जाग आली.

महिलेच्या पतीने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने त्याला धक्का दिला. यावेळी उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला. नवऱ्याने बाहेर जाऊन त्याचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला. मात्र अंधारात आरोपी कुठे पसार झाला, हे समजलंही नाही. महिलेच्या मनात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

संबंधित बातमी : एका मुलीसाठी एकच सिम, पर्स घरी विसरल्याचा बहाणा, मॅट्रिमोनिअल साईटवरुन मुलींना फसवणारा इंजिनिअर गजाआड

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.