एका मुलीसाठी एकच सिम, पर्स घरी विसरल्याचा बहाणा, मॅट्रिमोनिअल साईटवरुन मुलींना फसवणारा इंजिनिअर गजाआड

एका मुलीसाठी एकच सिम, पर्स घरी विसरल्याचा बहाणा, मॅट्रिमोनिअल साईटवरुन मुलींना फसवणारा इंजिनिअर गजाआड
Navi Mumbai Crime

मॅट्रिमोनिअल साईटवरुन लग्नाळू मुलींशी संपर्क करुन त्यांची फसवणूक (APMC Police Arrest One Engineer) करुन त्यांना लुटणाऱ्या भामट्याला  एपीएमसी पोलिसांनी गजाआड केले.

हर्षल भदाणे पाटील

| Edited By: Nupur Chilkulwar

Jun 08, 2021 | 2:22 PM

नवी मुंबई : मॅट्रिमोनिअल साईटवरुन लग्नाळू मुलींशी संपर्क करुन त्यांची फसवणूक (APMC Police Arrest One Engineer) करुन त्यांना लुटणाऱ्या भामट्याला  एपीएमसी पोलिसांनी गजाआड केले. हा भामटा जीवनसाथी डॉट कॉम या मॅट्रिमोनिअल साईटवरुन लग्नाळु मुलींना रिक्वेस्ट पाठवायचा आणि त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची फसवणूक करायचा (APMC Police Arrest One Engineer Who Did Fraud With Many Girls In The Name Of Marriage From Matrimonial Site).

मॅट्रिमोनिअल साईटवर केले होते लग्नासाठी खाते रजिस्टर

लग्नाळू मुलींची फसवणूक करण्याच्या उद्देशाने महेश गुप्ता उर्फ करण (वय-32) याने मॅट्रिमोनिअल साईटवर लग्नाचेसाठी खाते रजिस्टर केले होते. तो बिजनेसमॅन असल्याचे भासवत होता. त्याला भाळून कित्येक तरुणींनी त्याने पाठवलेल्या रिक्वेस्टला प्रतिसाद दिला होता.

तरुणींना मोठ्या मॉल किंवा महागड्या हॉटेलमध्ये भेटायला बोलवायचा

महेश गुप्ता हा तरुणींना मोठ्या पब, मॉलमध्ये किंवा हॉटेलमध्ये भेटायला बोलवत होता. त्यानंतर घरी पर्स विसरलो असे सांगत खर्च देखील मुलींनाच करायला लावायचा. इतकंच नाही तर तो मुलींशी जवळीक साधत लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्नही करत असत.

एका महिलेला फसविण्यासाठी एक सिम

आरोपी महेश गुप्ता याच्या विरोधात 29 जानेवारीला पुण्यातील एका तरुणीने तक्रार दाखल केली आणि त्याच्याविरुद्ध पहिला गुन्हा एपीएमसी पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्यामुळे एपीएमसी पोलीस त्याच्या मागावर होते.

आरोपी उच्चशिक्षित असून त्याने हॅकर म्हणून देखील केले काम

संबधित आरोपी हा उच्चशिक्षित असून इंजिनिअर आहे. त्याने एमईपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. शिवाय, कित्येक नामांकित कंपन्यांमध्ये त्याने उच्च पदावर काम केले आहे. तो त्याच्या बोलण्याने तरुणींना भुरळ पाडत होता. एका महिलेला फसविण्यासाठी तो एकाच मोबाईलचा आणि एकाच सिमचा वापर करत होता.

आतापर्यंत अनेक लग्नाळू मुलींवर लैगिंक अत्याचार करण्याचा केला प्रयत्न

आतापर्यंत त्याने 10 ते 15 महिलांचे लैगिंक शोषण करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. गेली चार महिने एपीएमसी पोलीस संबधित आरोपीच्या मागावर होते.

आरोपीला चार दिवसांनी पोलीस कोठडी

संबधित आरोपीला बेलापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुरु आहे.

APMC Police Arrest One Engineer Who Did Fraud With Many Girls In The Name Of Marriage From Matrimonial Site

संबंधित बातम्या :

फेसबुकवर चाईल्ड पोर्नोग्राफीचा व्हीडिओ टाकणाऱ्या इंजीनिअरिंगच्या विद्यार्थ्याला अटक

Video: पोटात घुसलेला चाकू घेऊन तरुण पोलीस ठाण्यात, नागपूरच्या व्हिडीओनं महाराष्ट्र हादरला

लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टरकडून बलात्कार, नर्सचा आरोप, मुंबईत गुन्हा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें