लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टरकडून बलात्कार, नर्सचा आरोप, मुंबईत गुन्हा

Mumbai crime news : लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टरने नर्सवर बलात्कार (Nurse rape) केल्याचा आरोप आहे. मुंबईत ही धक्कादायक घटना घडली.

लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टरकडून बलात्कार, नर्सचा आरोप, मुंबईत गुन्हा
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टरने नर्सवर बलात्कार (Nurse rape) केल्याचा आरोप आहे. मुंबईत ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी डॉक्टरवर (Doctor) वांद्रे पोलिस ठाण्यात (Bandra Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नर्सच्या आरोपांच्याआधारे वांद्रे पोलिसांनी डॉक्टरविरोधात कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र पोलिसांनी अद्याप आरोपी डॉक्टरवर अटकेची कारवाई केली नाही. (Mumbai Nurse alleges rape by doctor case registered by Bandra Police)

नेमकं प्रकरण काय?

आरोपी डॉक्टर आणि तक्रारदार नर्स एकमेकांना अनेक दिवसांपासून ओळखतात. तक्रारदार नर्सच्या आरोपानुसार, आरोपी डॉक्टर आणि तिच्यात प्रेमसंबंध होते. पुढे हे दोघेही लग्न करणार होते. लग्नाचे आमिष दाखवून आपल्यावर अत्याचार केला, असा आरोप नर्सने केला आहे. दरम्यान, तक्रारदार नर्सने डॉक्टरकडे लग्नासाठी विचारणा केली. मात्र डॉक्टरने त्याला नकार दिल्याचं म्हणणं नर्सचं आहे.

वांद्रे पोलीसात तक्रार 

दरम्यान, याप्रकरणी नर्सने मुंबई पोलिसात धाव घेतली आहे. नर्सने संबंधित डॉक्टरवर गंभीर आरोप केले आहेत. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार नर्सने दिली आहे. नर्सच्या तक्रारीनंतर वांद्रे पोलिसांनी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कलम 376 अर्थात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे याप्रकरणात आता काय कारवाई होते हे पाहावं लागेल.

संबंधित बातम्या 

औरंगाबादमध्ये हत्यांचं सत्र, 15 दिवसांत धारदार शस्त्रांनी 6 हत्या, गुन्हेगारांचा पोलिसांना आव्हान देण्याचा प्रयत्न!

(Mumbai Nurse alleges rape by doctor case registered by Bandra Police)