औरंगाबादमध्ये हत्यांचं सत्र, 15 दिवसांत धारदार शस्त्रांनी 6 हत्या, गुन्हेगारांचा पोलिसांना आव्हान देण्याचा प्रयत्न!

औरंगाबादमध्ये हत्यांचं सत्र, 15 दिवसांत धारदार शस्त्रांनी 6 हत्या, गुन्हेगारांचा पोलिसांना आव्हान देण्याचा प्रयत्न!
औरंगाबादमध्ये हत्येचं सत्र सुरुच

औरंगाबादमध्ये कायद्याचा धाक संपलाय की काय? अशा प्रश्न आता औरंगाबादकर विचारत आहेत. कारण मागील 15 दिवसांपासून औरंगाबादेतील विविध भागांत 6 हत्या झाल्यात. (between 15 Days 6 murder in Aurangabad)

Akshay Adhav

|

Jun 05, 2021 | 10:34 AM

औरंदाबाद : औरंगाबादमध्ये कायद्याचा धाक संपलाय की काय? अशा प्रश्न आता औरंगाबादकर विचारत आहेत. कारण मागील 15 दिवसांपासून औरंगाबादेतील विविध भागांत 6 हत्या झाल्यात. त्यामुळे औरंगाबाद पुरतं हादरुन गेलंय. हत्यासत्राने शहरात दहशतीचं वातावरण आहे. हत्या झालेले सगळे सहाही जण गुन्हेगारी क्षेत्राशी निगडीत आहेत.  (between 15 Days 6 murder in Aurangabad)

21 ते 30 वयाच्या दरम्यान असलेल्या तरण्याबांड पोरांच्या हत्या

15 दिवसांपासून औरंगाबादमध्ये कुणाचा ना कुणाचा खून झाल्याचं ऐकायला मिळतंय. त्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे हत्या सगळेच जण तरुण वयोगटातील आहेत. 21 ते 30 वयाच्या दरम्यान असलेल्या तरण्याबांड पोरांच्या हत्या होत आहेत. त्यामुळे औरंगाबादची तरुणाई गुन्हेगारीच्या विळख्यात अडकली की काय, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.

गुन्हेगारांचा पोलिसांना आव्हान देण्याचा प्रयत्न

औरंगाबादमधील वाळूंज MIDC पोलिसांच्या हद्दीत गेल्या 15 दिवसांत दोन हत्या झाल्या. दुसीरकडे सीटी चौक, छावणी, सिडको एमआयडीसीमध्ये एक-एक हत्या झाल्याचं समोर आलंय. म्हणजेच शहरातील वर्दळीच्या ठिकाणी हत्येचं सत्र आहे. त्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. यानिमित्ताने गुन्हेगार पोलिसांना तर आव्हान देत नाहीत ना, अशी चर्चाही सुरु आहे.

शुक्रवारी साडूसडून साडूचा गेम

शहरात शुक्रवारी एका कुख्यात गुंडाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आलीय. जमीर शब्बीर खान असं त्याचं नाव आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार पैशांच्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे. साडूने साडूची हत्या केल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलंय.

जमीन खान आणि त्याचा साडू यांचा पैशावरुन वाद झाला होता. वाद होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. याअगोदरही त्यांच्यात पैशावरुन खटके उडायचे. मात्र त्या त्या वेळी भांडणं मिटायचं. काल मात्र असं काही झालं नाही. शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास शहाजान मंडीतील जैन धर्मशाळेच्या एका बिल्डिंगजवळ उभा होता. यावेळी जमीरचा साडू शोएब खान (Shoaib Khan) एका मित्रासह तिथे आला. त्यांच्यात पुन्हा पैशावरुन वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की साडू शोएब खानने त्याच्या मित्रासह धारदार शस्त्राने जमीरवर घाव घातले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

शोएबने धारदार शस्त्राने जमीरच्या छाती, पोटावर वार केले. जमीर रक्ताच्या थारोळ्यात पडला. यानंतर शोएब आणि त्याचा मित्र घटनास्थळावरुन पळून गेले. पण पोलिसांनी काही तासांच्या आतच जमीरचा साडू शोएबला अटक केली आहे.

(between 15 Days 6 murder in Aurangabad)

हे ही वाचा :

औरंगाबादमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, धारदार शस्त्राने छाती, पोटावर वार, साडूकडून साडूचा ‘गेम’!

भर दुपारी दरोडेखोर बांधकाम व्यावसायिकाच्या घरात घुसला, 50 लाखांच्या खंडणीची मागणी, नागपूर पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें