भर दुपारी दरोडेखोर बांधकाम व्यावसायिकाच्या घरात घुसला, 50 लाखांच्या खंडणीची मागणी, नागपूर पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई

नागपुरात एक दरोडेखोर भर दिवसा दुपारी अडीचच्या सुमारास बंदूक आणि चाकू घेऊन एका बांधकाम व्यवसायिकाच्या घरात शिरला (Nagpur Police arrested robber who entered builder house and demand ransom of 50 lakh rupees).

भर दुपारी दरोडेखोर बांधकाम व्यावसायिकाच्या घरात घुसला, 50 लाखांच्या खंडणीची मागणी, नागपूर पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई
प्रातिनिधिक फोटो
सुनील ढगे

| Edited By: चेतन पाटील

Jun 04, 2021 | 6:54 PM

नागपूर : मोठमोठ्या उद्योगपतींच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देवून खंडणी मागण्याचे प्रकार आपण चित्रपटांमध्ये बघितले आहेत. चित्रपटांमध्ये बऱ्याचदा उद्योगपतींच्या घरात दरोडा टाकलेल्यांना पोलिसांनी यशस्वीपणे अटक केल्याचं आपण बघितलं आहे. अगदी तसाच प्रकार नागपुरात वास्तव्यात घडला आहे. नागपुरात एक दरोडेखोर भर दिवसा दुपारी अडीचच्या सुमारास बंदूक आणि चाकू घेऊन एका बांधकाम व्यवसायिकाच्या घरात शिरला. त्यांनी घरातील नागरिकांना जीवे मारण्याची धमकी देऊन 50 लाखांची खंडणी मागितली. पण पोलिसांनी अत्यंत चपळपणे सिनेस्टाईल या दरोडेखोरांना अटक केली (Nagpur Police arrested robber who entered builder house and demand ransom of 50 lakh rupees).

संबंधित घटना ही नागपूरच्या पिपळा फाटा परिसरात घडली आहे. या परिसरातील बांधकाम व्यावसायिक राजू वैद्य यांच्या घरात एक दरोडखोर घुसला. त्याने राजू वैद्य यांच्या कुटुंबियांना ओलील धरलं होतं. पोलिसांनी या आरोपीला मोठ्या शिताफीने आणि सिनेस्टाईल पद्धतीने आरोपीला अटक केली. हा थरार नेमका कसा घडला, याबाबतची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

पोलिसांनी कारवाई कशी केली?

राजू वैद्य हे बांधकाम व्यावसायिक आहेत. दुपारी अडीचच्या सुमारास आरोपी बंदूक आणि चाकू घेऊन घरात शिरला. त्याने घरातील वैद्य कुटुंबियांना ओलीस ठेवले आणि 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपीला अटक करण्यासाठी नियोजन केलं. पोलिसांनी घराच्या छपरावरून घरात शिरत या आरोपीला सिनेस्टाइल अटक केली. त्याला गाफील ठेवण्यासाठी आणि त्याने घरच्यांना इजा करू नये यासाठी सुरुवातीला घरातल्यांनी त्याला तीनदा दोन लाख रुपये दिले. या दरम्यान पोलिसांना वेळ मिळाला आणि त्याच्या अंगावर जाळी टाकून अटक केली.

पोलिसांची प्रतिक्रिया

हा आरोपी अडीच वाजता या घरात शिरला आणि सगळं ओलीस जवळपास 3 तास चाललं. यामुळे परिसरातील नागरिकांनी बाहेर मोठी गर्दी केली होती. मात्र पोलिसांनी राबविलेलं हे नाट्य मोठ्या शिताफीने राबविले आणि घरातील सगळ्या जणांची सुखरूप सुटका केली आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला, अशी प्रतिक्रिया सहाय्यक पोलीस आयुक्त राजू पालवे यांनी दिली (Nagpur Police arrested robber who entered builder house and demand ransom of 50 lakh rupees).

हेही वाचा : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या महिला खेळाडूवर पोलीस अधिकाऱ्याचा बलात्कार, पंजाब पोलिसात मोठी खळबळ

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें