AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याण-डोंबिवलीत चोरट्यांचा हैदोस, एकाच दिवसात तीन महिलांचे मंगळसूत्र लांबवले !

कल्याण-डोंबिवलीत भरदिवसा भररस्त्यात महिलांना लुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

कल्याण-डोंबिवलीत चोरट्यांचा हैदोस, एकाच दिवसात तीन महिलांचे मंगळसूत्र लांबवले !
कल्याणमध्ये सोनसाखळी चोरांचा सुळसुळाटImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jul 14, 2023 | 11:27 AM
Share

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरात मंगळसूत्र, सोनसाखळी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत होत आहे. एकाच दिवशी रस्त्याने पायी जाणाऱ्या तीन महिलांच्या गळ्यातून दुचाकीस्वारांनी मंगळसूत्र हिसकावून पळ काढल्याची घटना घडली. या घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. एकाच दिवसात या चोरांनी दीड लाखाहून अधिक रकमेचा सोन्याचा ऐवज लुटला. सध्या डोंबिवलीतील मानपाडा कल्याणमधील बाजारपेठ आणि कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तिन्ही महिलांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विविध टीम बनवत आरोपीचा शोध सुरू केला आहे. मात्र ही बातमी परिसरात पसरताच महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला बेड्या ठोकण्याची मागणी कल्याण डोंबिवलीकरांकडून होत आहे.

कल्याण डोंबिवली परिसरातील रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याचा ऐवज लुटून नेण्याच्या घटना वाढतच चालल्याने महिला वर्गामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. बुधवारी दिवसभरात डोंबिवली, कल्याणमध्ये दुचाकीवरुन आलेल्या भुरट्या चोरांनी तीन महिलांच्या गळ्यातील दीड लाखाहून अधिक रकमेचा सोन्याचा ऐवज लुटले आहे.

एकाच दिवसात मंगळसूत्र चोरीच्या तीन घटना

पहली घटना कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी भागात राहाणाऱ्या 49 वर्षीय रेखा राम धुमाळे या सकाळी साडे दहा वाजता विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळून पायी चालल्या होत्या. यावेळी दुचाकीवरुन दोन जण वेगाने त्याच्या जवळ आले आणि त्यांनी काही कळण्याच्या आत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. रेखा यांनी चोरट्यांना विरोध केला, पण चोरट्यांनी त्यांना जमिनीवर ढकलून देऊन दुखापत करुन पळून गेले. यात रेखा किरकोळ जखमी झाली. या प्रकरणी त्यांनी कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दुसरी घटना डोंबिवली एमआयडीसीती परिसरात घडली आहे. या घटनेत डोंबिवलीतील सुदर्शन नगरमध्ये राहणाऱ्या 72 वर्षीय अरुंधती कुलकर्णी या सकाळी साडे सात वाजता आपल्या सुनेबरोबर मॉर्निंग वॉक करण्यासाठी बाहेर पडल्या. यावेळी सेंट जोसेफ शाळेच्या बाजूने दुचाकीवरुन दोन जण आले. त्यांनी अरुंधती यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

तर तिसरी घटना कल्याण पश्चिमेतील काळा तलाव परिसरात राहणाऱ्या 51 वर्षीय विजया लासुरे या सकाळी सव्वा दहाच्या सुमारास पायी जात होत्या. दुचाकीवरुन दोन जण त्यांच्याजवळ अचानक आले. त्यांनी मानेवर जोराने फटका मारुन त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. विजया यांनी चोरट्यांना विरोध केला. या झटापटीत चोरट्यांनी त्यांचे कपडे फाडून मंगळसूत्र लंपास केले. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Follow Us
मोठा एल्गार! मुंबईला जायची तयारी करा; लवकरच... मनोज जरांगेंचं मराठा...
मोठा एल्गार! मुंबईला जाण्याची तयारी करा; लवकरच... मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन
दिल्लीतील स्लीपर बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार
New Delhi Crime | महिला सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह! दिल्लीतील स्लीपर बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, नेमकं घडलं काय?
महायुतीत खलबत? दरेकरांच्या गडाला शिंदेंचे आव्हान, मुंबई बँकांच्या...
महायुतीत खलबत? दरेकरांच्या गडाला शिंदेंचे आव्हान, मुंबई बँकांच्या निवडणुकीत...
जळगावात ड्रग्जविरोधात मोठी कारवाई! 5 किलो MD पावडर जप्त, किंमत तब्बल..
Jalgaon | जळगावात ड्रग्जविरोधात मोठी कारवाई! 5 किलो MD पावडर जप्त, किंमत तब्बल 1.25 कोटी
MPSC पेपरफुटीत मोठा खुलासा! 5 लाखांचा व्यवहार अन् प्रकरण आलं समोर
MPSC पेपरफुटीत मोठा खुलासा! माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून फोडला पेपर? 5 लाखांचा व्यवहार अन् प्रकरण आलं समोर
जो ठाकरेंचा होऊ शकला नाही, तो जरांगेंचा कसा होणार?
Sanjay Raut UNCUT | जो ठाकरेंचा होऊ शकला नाही, तो जरांगेंचा कसा होणार?; बंडू जाधवांवर संजय राऊतांचा घणाघात
भागवतांचं ते विधान म्हणजे RSSच्या प्लेबुकमधली जुनी खेळी!
Asaduddin Owaisi | भागवतांचं ते विधान म्हणजे RSSच्या प्लेबुकमधली जुनी खेळी! असदुद्दीन ओवैसींचा थेट हल्लाबोल
मोबाईलवर बोलत कार चालवणं जीवावर बेतलं! वांद्र्यात भरधाव कारची...
Bandra Accident | मोबाईलवर बोलत कार चालवणं जीवावर बेतलं! वांद्र्यात भरधाव कारची चिमुरड्याला धडक; अंशचा दुर्दैवी मृत्यू
पुण्यामध्ये मद्यपी कार चालकाचा हायव्होल्टेज ड्रामा; पोलिसांना शिवीगाळ
Pune | पुण्याच्या वाकडमध्ये मद्यपी कार चालकाचा हायव्होल्टेज ड्रामा; पोलिसांना शिवीगाळ करत दमदाटी
ठाणे बँकेनंतर शिंदे गटाची नजर मुंबई बँकेवर; भाजपाला थेट टक्कर देणार?
Mumbai Bank | ठाणे बँकेनंतर शिंदे गटाची नजर मुंबई बँकेवर; भाजपाला थेट टक्कर देणार?