आई शेतात गेली, नराधमांकडून गतिमंद तरुणीवर घरात घुसून बलात्कार, महाराष्ट्रातील अत्याचार थांबेनात!

पुण्यातील बलात्काराच्या घटनांनी राज्यभर रोष व्यक्त होत असताना, तिकडे बुलडाण्यातही तसाच प्रकार समोर आला आहे. लडाणा जिल्ह्यातील गतिमंद तरुणीवर बलात्कार झाला आहे.  अमडापूर इथे 15 सप्टेंबरला दुपारी ही घटना घडली.

आई शेतात गेली, नराधमांकडून गतिमंद तरुणीवर घरात घुसून बलात्कार, महाराष्ट्रातील अत्याचार थांबेनात!
प्रातिनिधिक फोटो

बुलडाणा : पुण्यातील बलात्काराच्या घटनांनी राज्यभर रोष व्यक्त होत असताना, तिकडे बुलडाण्यातही तसाच प्रकार समोर आला आहे. लडाणा जिल्ह्यातील गतिमंद तरुणीवर बलात्कार झाला आहे.  अमडापूर इथे 15 सप्टेंबरला दुपारी ही घटना घडली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून अमडापूर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपींना अटकही केली आहे. (Buldhana rape case )

दोन्ही आरोपी अमडापूर इथलेच रहिवासी आहेत. अमडापूर येथील 19 वर्षीय गतिमंद मुलगी घरी एकटीच होती. तिची आई शेतात कामासाठी गेलेली होती. गावातीलच दोन्ही नराधम घरात मुलगी एकटीच असल्याचे पाहून घरात घुसले. दोघांनी तिच्यावर बळजबरीने आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला.

पीडितेची आई शेतातून घरी आली असता दोघांनी तेथून पळ काढला. घडलेला प्रकार पीडितेने तिच्या आईला सांगितला, त्यानंतर पीडितेच्या आईने मुलीला घेऊन अमडापूर पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी दोघांविरुद्ध तक्रार दिली.

पोलिसांनी आरोपींविरोधात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. दोन्हीही आरोपींना अमडापूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन्ही आरोपींना एक दिवसाचा पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

पुण्यातील वानवडी बलात्काराने महाराष्ट्र हादरला 

पुण्यातील वानवडी येथील सामूहिक बलात्कार प्रकरणात दररोज धडकी भरवणारी माहिती समोर येत आहे. 13 वर्षीय पीडितेवर केवळ पुण्यातच नाही तर मुंबईजवळही अत्याचार झाल्याचे आता समोर आलं आहे. वानवडी पोलीस करत असलेल्या तपासाचे धागेदोरे ठाण्यापर्यंत पोहोचले आहेत. वानवडी पोलिसांनी ठाण्यातून एका आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे बलात्कार प्रकरणातील आरोपींची संख्या 17 झाली असून यातील 14 जणांनी बलात्कार केल्याचे निष्पन्न झालं आहे.

पुणे रेल्वे स्थानक परिसरातून 13 वर्षीय मुलीचं अपहरण करुन रेल्वेतील दोन कर्मचारी आणि काही रिक्षा चालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार 5 सप्टेंबरला उघडकीस आला होता.

संबंधित बातम्या  

Pune : वानवडी बलात्काराची धडकी भरवणारी माहिती, 13 वर्षीय मुलीवर 14 जणांकडून बलात्कार, आतापर्यंत 17 जणांना बेड्या 

वर्षभर सामूहिक बलात्कार, पीडितेच्या घरात शिरुन कुटुंबियांनाही मारहाण, पुण्यातल्या नण्या वाघमारे गँगचं भयानक कृत्य

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI