वर्षभर सामूहिक बलात्कार, पीडितेच्या घरात शिरुन कुटुंबियांनाही मारहाण, पुण्यातल्या नण्या वाघमारे गँगचं भयानक कृत्य

आरोपी हे नण्या वाघमारे गॅंगमधील सराईत बाल गुन्हेगार आहेत. गेल्या वर्षापासून हा प्रकार सुरु होता. आरोपींनी पीडित मुलीच्या घरात आपल्या गॅंगच्या सदस्यांसोबत बळजबरीने घुसून तिला आणि तिच्या कुटुंबियांना मारहाण देखील केली.

वर्षभर सामूहिक बलात्कार, पीडितेच्या घरात शिरुन कुटुंबियांनाही मारहाण, पुण्यातल्या नण्या वाघमारे गँगचं भयानक कृत्य
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 10:28 PM

पुणे : पुणे-मुंबईत शिक्षण घेण्याचं तरुण-तरुणींना चांगलंच आकर्षण असतं. त्याच आकर्षणातून राज्यभरातील हजारो विद्यार्थी-विद्यार्थींनी ग्रामीण भागातून येऊन पुणे-मुंबईत शिक्षण घेतात. पण स्वप्नांच्या या शहरांमध्ये महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत आहेत. पुणे जिल्ह्यात शिक्षिकेवरील अत्याचाराची, तसेच तीन अल्पवयीन मुलींवरील बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या घटना ताज्या असताना पिंपरी चिंचवडमधून आणखी एक घटना समोर आली आहे. खरंतर ही घटना गेल्या महिन्यात 28 ऑगस्टला उघडकीस आली होती. मात्र, पीडित मुलीसोबत किती भयानक प्रकार घडलाय ते आता पोलीस तपासातून समोर आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

पिंपरी चिंचवड शहरात सराईत बाल गुन्हेगारांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना 28 ऑगस्ट रोजी समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं होतं. याच प्रकरणाच्या तपासादरम्यान पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हाती महत्त्वपूर्ण माहिती लागली आहे. अल्पवयीन पीडितेवर सामूहिक अत्याचार करणारे हे नराधम नण्या वाघमारे गँगमधील सराईत बाल गुन्हेगार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे पीडितेसोबत गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरु होता, अशी धक्कादायक माहिती आता तपासातून समोर आली आहे.

पीडितेच्या घरात शिरुन कुटुंबियांना मारहाण

आरोपी हे नण्या वाघमारे गॅंगमधील सराईत बाल गुन्हेगार आहेत. गेल्या वर्षापासून हा प्रकार सुरु होता. आरोपींनी पीडित मुलीच्या घरात आपल्या गॅंगच्या सदस्यांसोबत बळजबरीने घुसून तिला आणि तिच्या कुटुंबियांना मारहाण देखील केली. तसेच पीडितेच्या लैंगिक अत्याचाराची व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची आणि ठार मारण्याची धमकी देऊन वारंवार सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. तर नण्यासह आणखी एकाचा शोध सुरु आहे.

पिंपरीत शिक्षिकेवर बलात्कार

दुसरीकडे पिंपरीत निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त असल्याचे सांगत एका नराधमाने शिक्षिकेवर बलात्कार केला. संबंधित शिक्षिकेला पैशाची आर्थिक अडचण असल्याने त्यांनी ओळखीने आरोपी विकास अवस्थी यांच्याकडे पैशाची मागणी केली. आरोपी विकास अवस्थीने दहा टक्के व्याजाने पैसे देतो असे सांगून पीडित महिलेला घरी बोलावून त्यांच्याकडून दोन कोऱ्या चेकवर ,कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. त्यानंतर पीडित महिलेला सॉफ्टड्रिंक देऊन दुष्कृत्य केले. तसेच पीडित महिलेचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून, ते सर्वांना दाखवून बदनामी करेल अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.

पुणे शहरात सहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

पुण्यात आठ दिवसांपूर्वी एका 13 वर्षाच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. रेल्वे स्टेशन परिसरात झोपलेल्या अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आलेली आहे. विशेष म्हणजे या घटनेतही अत्याचार करणारा हा एक रिक्षाचालक असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तर पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पीडितेला फुटपाथवरुन उचलून नेत अपहरण

पीडित सहा वर्षीय चिमुकली ही रात्रीच्या वेळी फुटपाथवर झोपली होती. आरोपीने तिला फुटपाथवरुन उचलून नेत तिचं अपहरण केलं होतं. त्यानंतर आरोपीने चिमुकलीवर बलात्कार केला. या संतापजनक प्रकाराची माहिती पीडितेच्या आई-वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार केली. तसेच पीडितेला त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पीडितेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हेही वाचा :

पुणे वानवडी अल्पवयीन मुलीवर गँगरेप, दोन लॉज मॅनेजर ताब्यात, आरोपींची संख्या 16 वर

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.