AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे जिल्ह्यात आठवड्याभरातील तिसरी भीषण घटना, 13 वर्षीय चिमुकलीवर चार जणांकडून वारंवार बलात्कार

पुणे शहरात आठवड्याभरात दोन बलात्काराच्या संतापजनक घटना समोर आल्या असताना पुणे ग्रामीण भागातून देखील तशीच एक घटना समोर आली आहे. खेड तालुक्यातील एका गावात 12 वर्षीय चिमुकलीवर 5 नराधमांनी वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला.

पुणे जिल्ह्यात आठवड्याभरातील तिसरी भीषण घटना, 13 वर्षीय चिमुकलीवर चार जणांकडून वारंवार बलात्कार
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: Chetan Patil | Updated on: Sep 09, 2021 | 11:08 PM
Share

पुणे : पुणे शहरात आठवड्याभरात दोन बलात्काराच्या संतापजनक घटना समोर आल्या असताना पुणे ग्रामीण भागातून देखील तशीच एक घटना समोर आली आहे. खेड तालुक्यातील एका गावात 12 वर्षीय चिमुकलीवर 5 नराधमांनी वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. तर एका आरोपीने वारंवार विनयभंग केला. आरोपी गेल्या तीन महिन्यांपासून पीडितेवर अत्याचार करत होते.

चार आरोपींना अटक

प्रत्येक आरोपीने पीडित चिमुरडीला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी पीडितेवर अत्याचार केल्यानंतर धमकावत होते. त्यामुले पीडिता घरी कुणालाही अत्याचाराबद्दल सांगत नव्हती. दरम्यान, या प्रकरणी खेड पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. संबंधित घटना ही सामूहिक बलात्काराची नाही. त्यामुळे आरोपींविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.

पुणे शहरात सहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

पुण्यात आठ दिवसांपूर्वी एका 13 वर्षाच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. रेल्वे स्टेशन परिसरात झोपलेल्या अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आलेली आहे. विशेष म्हणजे या घटनेतही अत्याचार करणारा हा एक रिक्षाचालक असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तर पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पीडितेला फुटपाथवरुन उचलून नेत अपहरण

पीडित सहा वर्षीय चिमुकली ही रात्रीच्या वेळी फुटपाथवर झोपली होती. आरोपीने तिला फुटपाथवरुन उचलून नेत तिचं अपहरण केलं होतं. त्यानंतर आरोपीने चिमुकलीवर बलात्कार केला. या संतापजनक प्रकाराची माहिती पीडितेच्या आई-वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार केली. तसेच पीडितेला त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पीडितेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांकडून आरोपीला बेड्या

दरम्यान, पीडितेच्या पालकांच्या तक्रारीनंतर बंडगार्डन पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांकडून पीडितेच्या कुटुंबियांनाही सावरण्याचं काम करण्यात येतंय. तसेच पीडितेला न्याय मिळवून देऊ, असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलं आहे. या घटनेवर आता स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. आरोपींना थेट फाशीचीच शिक्षा द्या, अशी मागणी काही संतापलेल्या नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

पुण्यात आठ दिवसांआधी देखील अशीच घटना

पुण्यात आठ दिवसांपूर्वी देखील अशीच घटना समोर आली होती. पीडित 13 वर्षीय मुलगी ही 31 ऑगस्टच्या रात्री गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आली होती. यावेळी काही आरोपींना इतक्या रात्री तुला गाडी मिळणार नाही, असे सांगून रेल्वे स्थानकाबाहेर आणले. त्यानंतर तिचे अपहरण करत वानवडी परिसरात नेले आणि तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. तब्बल दोन दिवस हा सर्व प्रकार सुरु होता.

दरम्यान, रविवारी (5 सप्टेंबर) सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. वानवडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ या प्रकरणी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपींची ओळख पटवून सुरुवातीला आठ जणांना अटक करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत एकूण आरोपींची संख्या 16 वर गेली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

पीडितेची पोलिसात तक्रार

संबंधित घटना ही 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत घडल्याची माहिती पीडितेने दिली आहे. पीडितेने याबाबत पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली.

आरोपींना पोलिसांचा धाक नाही

पुण्यासारख्या जिल्ह्यात सामूहिक बलात्काराच्या घटना घडत असतील तर आरोपींना पोलिसांचा जराही धाक राहिलेला नाही का, असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे. आरोपी अवघ्या 13 वर्षांच्या मुलीचं अपहरण करतात, त्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार करतात, दोन दिवस या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आरोपींच्या मनात पोलिसांविषयी भीती राहिलेली नाही. त्यातूनच या अशा घटना घडत आहेत, असं मत आता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केलं जात आहे. तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

हेही वाचा :

पुणे वानवडी अल्पवयीन मुलीवर गँगरेप, दोन लॉज मॅनेजर ताब्यात, आरोपींची संख्या 16 वर

Follow Us
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष