AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत २० हून अधिक घरे, ३०० भक्त, किन्नरांची गुरु माँ उर्फ अयान खान पोलिसांच्या बेड्या

मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत बांग्लादेशी मूळ असलेल्या ट्रान्सजेंडर ‘गुरु माँ’ उर्फ ज्योती उर्फ अयान खानला अटक केली आहे. तिची मुंबईत २० हून अधिक घरे असून तिचे शेकडो अनुयायी आहेत.

मुंबईत २० हून अधिक घरे, ३०० भक्त, किन्नरांची गुरु माँ उर्फ अयान खान पोलिसांच्या बेड्या
| Updated on: Oct 17, 2025 | 6:46 PM
Share

महाराष्ट्राच्या मुंबईच्या पोलिसांनी एका कारवाईत बांग्लादेशी मुळ असलेल्या ट्रान्सजेंडर ज्योती उर्फ अयान खान उर्फ गुरु माँला अटक केली आहे. ज्योती तृतीयपंथी असून गेल्या तीस वर्षांपासून खोट्या भारतीय दस्तावेजासह भारतात रहात होती आणि तिचे शेकडो भक्त देखील आहेत. पोलिसांच्या चौकशीत पुढे आले की ज्योतीचे खरे नाव बाबू अयान खान आणि मुंबईच्या गोवंडी, रफिक नगर, कुर्ला, देवनार, नारपोली आणि ट्रॉम्बे विभागात सक्रीय होती. या ज्योतीच्या मुंबईत २० हून अधिक संपत्ती आहेत. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत असून या प्रकरणात काही आणखी लोकांना अटक होण्याची शक्यता आहे.

ट्रान्सजेंडर ज्योती उर्फ अयान खान हीचे तीनशेहून अधिक अनुयायी आहेत. हे अनुयायी तिला गुरु माँ म्हणून मानतात. मार्च २०२५ मध्ये शिवाजीनगर पोलिसांनी रफिक नगररातीन अनेक बांग्लादेशी ट्रान्सजेंडरना अटक केली होती. त्याचवेळी ज्योतीचे दस्तावेज देखील तपासले होते. त्यावेळी तिच्या आधार, पॅनकार्ड आणि वैध कागदपत्रे उपलब्ध होती. त्यामुळे त्यावेळी ज्योतीला सोडून देण्यात आले होते.

मुंबईत 20 हून अधिक घरे

यानंतर पोलिसांनी तिच्या सर्व कागदपत्रांची सखोर तपासणी केली. त्यावेळी ही कागदपत्रे बनावट आढळली. त्यामुळे त्याआधारे ज्योतीला अटक करण्यात आली आहे.तपासात असे समजले की ज्योतीचे मुंबईत सुमारे २० हून अधिक घरे आहेत. ज्यातील अनेक घरे रफिकनगर आणि गोवंडी विभागात आहेत.या घरात तिचे अनुयायी राहातात आणि तिला आपला गुरु मानतात, परंतू आता ज्योतीच बांग्लादेशी असल्याचे उघडकीस आले आहे.

पोलिसांनी तपास सुरु केला

पोलिसांनी ज्योती उर्फ अयान खानच्या विरोधात पासपोर्ट अधिनियम आणि भारतीय न्या संहितेच्या (BNS)अनेक कलमांतर्ग गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आता ज्योती नेमकी किती वर्षांपासून भारतात खोट्या बनावट दस्तावेजाआधारे रहात आहे ? तिला कागदपत्रे मिळवून देण्यात कोणी-कोणी मदत केली आहे. याचा तपास मुंबई पोलिस करत आहेत. तिच्या अनुयायांची देखील चौकशी केली जाणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...