लालबागमध्ये महिलेचा मृतदेह सापडला घरातल्या कपाटात, घरच्यांनी कांड केल्याचा पोलिसांना संशय, चौकशीसाठी मुलीला…

पोलिसांचा संशय मुलीवर असल्याने पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतलं आहे. चौकशीत लवकरचं या प्रकरणातील सत्य बाहेर येईल असही पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणात आणखी कितीजण आहेत, याची सुध्दा चौकशी होणार आहे.

लालबागमध्ये महिलेचा मृतदेह सापडला घरातल्या कपाटात, घरच्यांनी कांड केल्याचा पोलिसांना संशय, चौकशीसाठी मुलीला...
Crime News
Image Credit source: Google
| Updated on: Mar 15, 2023 | 7:50 AM

मुंबई : लालबाग (Lal Baug) परिसरात एका इमारतीत एका महिलेचा मृतदेह (Woman deadbody) कपाटात प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवल्याचा आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवलेला मृतदेह सापडल्याने पोलिसांनी (Kalachowki Police Station) मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांना चौकशीत सापडलेला मृतदेह कित्येक दिवस कपाटात होता, असं पोलिसांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर त्या महिलेचं वय सुध्दा 54 आहे. मृत झालेल्या व्यक्तीच्या भावाने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली.

22 वर्षीय मुलीला पोलिसांनी घेतले…

लालबाग नाका येथील इब्राहिम कासम या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एका रूममध्ये एका 54 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. ही महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या भावाने व भावाच्या मुलाने काळाचौकी पोलीस स्थानकात दिली होती. यानंतर पोलीस बेपत्ता महिलेच्या घरी तपास करण्यासाठी गेले. त्यावेळी त्या महिलेचा मृतदेह घरातील कपाटात एका प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवल्याचे आढळून आले, त्याचबरोबर हा मृतदेह अनेक दिवसांपासून या कपाटात पडून असल्याची माहिती देखील समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेसोबत राहणारी तिची 22 वर्षीय मुलगी ही चौकशी करिता ताब्यात घेतले असून काळाचौकी पोलिस आता याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

पोलिसांचा संशय मुलीवर असल्याने पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतलं आहे. चौकशीत लवकरचं या प्रकरणातील सत्य बाहेर येईल असही पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणात आणखी कितीजण आहेत, याची सुध्दा चौकशी होणार आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला मृतदेह आरोग्य तपासणीसाठी देण्यात आला आहे. आरोग्य तपासणी झाल्यानंतर नेमका मृत्यू कशामुळे झाला हे उजेडात येणार आहे.