AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा धक्का, माजी आमदाराच्या कुटुंबाने ठाकरे गटाची साथ सोडली; एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास

खेड-आळंदीचे शिवसेनेचे माजी आमदार, दिवंगत सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषाताई गोरे आणि त्यांचे बंधू नितीन गोरे यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी नंदनवन निवासस्थानी शिंदे गटात प्रवेश केला.

मोठा धक्का, माजी आमदाराच्या कुटुंबाने ठाकरे गटाची साथ सोडली; एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास
फाईल फोटोImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 15, 2023 | 7:27 AM
Share

पुणे : ठाकरे गटातील पडझड अजूनही थांबलेली नाही. ठाकरे गटातून अनेक नेते सोडून जात आहेत. यात आमदार तर आहेच पण माजी नगरसेवकही आहेत. याशिवाय इतर पदाधिकारीही आहेत. आता तर एका माजी आमदाराच्या कुटुंबानेही ठाकरे गटाची साथ सोडली आहे. खेड आळंदीतील हे माजी आमदाराचं कुटुंब आहे. त्यामुळे खेड आळंदीतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रवेशामुळे शिंदे गटाची ताकद वाढली आहे. तसेच शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांचा ओढा काही कमी होताना दिसत नाहीये.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: खेड आळंदीचे माजी आमदार सुरेश गोरे यांच्या पत्नी मनिषाताई सुरेश गोरे आणि त्यांचे बंधू नितीन गोरे यांना पक्षप्रवेश दिला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचं स्वागत केलं. मनीषा सुरेश गोरे आणि नितीन गोरे यांचे मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो. नितीन, मनीषाताई आणि त्यांचा परिवार बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेत दाखल होत आहेत. खेड आळंदी चाकणमध्ये रॅली काढली आणि हा मोठा प्रवेश झाला. एक मोठी ताकद चाकणमध्ये पाहायला मिळणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

वाढीव दरवाढ होणार नाही

बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असताना अनेक लोक येत आहेत. हे आपल्या सर्वांचे सरकार आहे. गेल्या सात आठ महिन्यात जे निर्णय घेतले ते सर्वांच्या हिताचे आहेत. त्याचप्रमाणे आपण सादर केलेला बजेट देखील सर्वसमावेशक आहे. आता सर्व अडथळे दूर झाले आहेत. अनेक प्रकल्प पुढे नेण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. चाकणमध्ये वाढीव दरवाढ होणार नाही. कारण त्यात काही त्रुटी आहेत त्या दूर होईपर्यंत दर वाढ होणार नाही, असं त्यांनी सांगितलं.

या सर्वांचा प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल माजी आमदार सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषाताई सुरेश गोरे, बंधू नितीन गुलाबराव गोरे, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्ड सदस्य, जिल्हा परिषद सदस्य रुपालीताई श्रीकांत कड, वकील विजयसिंह बाबासाहेब शिंदे, सभापती दत्ताशेठ भेगडे, माजी पंचायत समिती सदस्य मछिंद्र गावडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती काळूरामशेठ कड, खेड तालुका अध्यक्ष बिपिनशेठ रासकर, चाकण नगरपरिषद माजी नगराध्यक्ष मंगलताई गोरे, स्नेहलताई जगताप, चाकण नगरपरिषद माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र दत्तात्रय गोरे, वकील प्रकाश लक्ष्मण गोरे, ऋषिकेश झगडे, नगरसेवक निलेश बबन गोरे, प्रविण शांताराम गोरे, सुजाताताई मंडलिक, महेश मोरेश्वर शेवकरी, नयनाताई झनकर, संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष माऊली चिमाजी सातकर, भगवान पोखरकर, राजू जवळेकर आणि अशोक भुजबळ यांचा शिवसेनेत प्रवेश झाला.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.