Kalyan : 60 वर्षीय वृद्धाने 32 वर्षांच्या तरुणावर का केले चाकूने सपासप वार? कल्याणमध्ये खळबळ

| Updated on: Nov 22, 2022 | 11:21 AM

धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी! नेमका का करण्यात आला हल्ला? कारणंही समोर

Kalyan : 60 वर्षीय वृद्धाने 32 वर्षांच्या तरुणावर का केले चाकूने सपासप वार? कल्याणमध्ये खळबळ
धक्कादायक घटना
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

कल्याण : कचऱ्यावरुन जाब विचारला म्हणून एकाने तरुणाला भोसकलंय. ही धक्कादायक घटना कल्याण पूर्व (Kalyan East) इथं घडली. या घटनेत 60 वर्षांच्या वृद्ध इसमाने 32 वर्षांच्या तरुणावर चाकूने सपासप वार केलेत. या जीवघेण्या हल्ल्यात तरुण गंभीररीत्या जखमी (Kalyan Crime News) झाला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी (Kalyan Police) गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहेत. अब्दुल अली पलासोपकर असं हल्ला करण्याऱ्या वृद्ध आरोपी इसमाचं नाव आहे. तर जखमी तरुणाचं नाव सुदर्शन माथने असं आहे.

कल्याण पूर्वेतील आडीवली ढोकळी परिसरात राहणारा सुदर्शन हा शनिवारी रात्री 50-50 हॉटेलच्या पाठीमागील रस्त्यावरुन बाईकने जात होता. यावेळी या रस्त्यावरील अब्दुल यांच्या दुकानासमोरील कचऱ्याला आग लागली असल्याचे त्याला दिसले.

दिवाळी देखील येथील कचऱ्याला आग लागलेली असल्याने अब्दुल याच्याशी सुदर्शन याचा वाद झाला होता. वारंवार आग लावत असल्याने सुदर्शनने अब्दुलला कचऱ्याला आग का लावली? असा जाब विचारला.

पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांनी दिलेल्या माहितीनुसार, कचऱ्याला लागलेल्या आगीवरुन जाब विचारल्याचा राग आल्याने अब्दुल, त्याची पत्नी मैरुनिसा, मुलगी यास्मीन आणि 1 अनोळखी महिला यांच्यात बाचाबाची झाली. रागामध्ये मैरुनिसा यांनी पतीला चाकू आणून दिला. याच चाकून अब्दुलने सुदर्शन याच्या छातीवर व पोटावर सपासप वार केले. यामुळे एकच खळबळ उडाली.

गंभीर जखमी सुदर्शनवर मुंबईतील रुग्णालयात आता उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सुदर्शन याचा भाऊ शिवसागर याने पोलीस ठाण्यात चौघांविरोधात तक्रार दिलीय. सध्या पोलिसांनी अब्दुल व त्याची पत्नी मैरुनिसा या दोघांना अटक केली असून इतर आरोपीचा शोध सुरू आहे.