AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | कार चालकाची मुजोरी, कारवाईवेळी बीएमसी मार्शलला बोनेटवरुन फरफटत नेलं

विनामास्क वावरणाऱ्या कार प्रवाशांवर मुंबई महापालिकेकडून कारवाई सुरु असताना ही घटना घडली. संबंधित कार चालकाची बीएमसी मार्शलने अडवणूक केली. मात्र कार चालक न थांबता पुढे जाण्याच्या प्रयत्न करत होता. त्यामुळे मार्शल कारच्या बोनेटवर अर्धवट चढला.

VIDEO | कार चालकाची मुजोरी, कारवाईवेळी बीएमसी मार्शलला बोनेटवरुन फरफटत नेलं
बीएमसी मार्शलला गाडीच्या बोनेटवर फरफटत नेले
| Edited By: Anish Bendre | Updated on: Sep 02, 2021 | 12:04 PM
Share

मुंबई : बीएमसी मार्शलला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या रस्त्यांवर विनामास्क फिरणाऱ्या कार प्रवाशांवर कारवाई करत असताना ही घटना घडली. बोनेटवर चढून अडवणाऱ्या बीएमसी मार्शलला मुजोर कार चालकाने गाडीवर फरफटत नेल्याचा प्रकार घडला आहे. कार चालक न थांबता पुढे जाण्याच्या प्रयत्न करत असताना मार्शल कारच्या बोनेटवर आला होता. मुंबईतील सांताक्रुझ भागातील हा प्रकार कॅमेरात कैद झाला असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकं काय घडलं?

विनामास्क वावरणाऱ्या कार प्रवाशांवर मुंबई महापालिकेकडून कारवाई सुरु असताना ही घटना घडली. संबंधित कार चालकाची बीएमसी मार्शलने अडवणूक केली. मात्र कार चालक न थांबता पुढे जाण्याच्या प्रयत्न करत होता. त्यामुळे मार्शल कारच्या बोनेटवर अर्धवट चढला. त्यानंतरही कार चालकाने गाडी न थांबवता त्याला गाडीसोबत तसेच पुढे फरफटत नेले. सांताक्रुझ भागातील हा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. आरोपी कार चालक किंवा बीएमसी मार्शलविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

पाहा व्हिडीओ :

विनामास्क कारवाईसाठी बीएमसीच्या मार्शलची नेमणूक

राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा डोकं वर काढत असताना नागरिकांकडूनही काहीशी हलगर्जी बाळगली जात आहे. विनामास्क फिरणाऱ्या मुंबईकरांववर महापालिकेने कारवाईचा धडाका लावला आहे. मुंबई महापालिकेकडून लोकल प्रवासात मास्कचा वापर न करणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष मार्शल नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

क्लीन अप मार्शलच्या कोटावर ओळख

दुसरीकडे, काही क्लीन अप मार्शलची वर्तणूक योग्य नसल्याचं सांगत याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी काही महिन्यांपूर्वी महत्त्वपूर्ण सूचना केल्या होत्या. यामध्ये क्लीन अप मार्शल परिधान करत असलेल्या गणवेशावरील कोटवर संबंधित क्लीन अप मार्शलची ओळख दर्शविणारा क्रमांक, संबंधित विभागाचे नाव तसेच संबंधित कंत्राटदार याची माहिती द्यावी, क्लीन-अप मार्शल परिधान करीत असलेल्या कोटच्या समोरील आणि मागील बाजूस ठळक अक्षरात वाचता येईल, अशा पद्धतीने माहिती दिसली पाहिजे. जेणेकरून ठळकपणे त्याची ओळख सर्वांना समजेल तसेच बोगस क्लीन-अप मार्शल काम करीत असेल तर त्याचा सुद्धा शोध घेणे सहज सुलभ होईल, असं त्या म्हणाल्या होत्या.

संबंधित बातम्या :

विनामास्क मुंबईकर बीएमसीच्या रडारवर, एका दिवसात 27 लाखांची दंडवसुली

मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढण्याची भीती, विनामास्क प्रवाशांवर रेल्वेतही कारवाई

मुंबईतील क्लीन अप मार्शलच्या कोटवर त्याची ओळख असणार; गैरवर्तणुकीची महापौरांकडून गंभीर दखल

Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती