विनामास्क मुंबईकर बीएमसीच्या रडारवर, एका दिवसात 27 लाखांची दंडवसुली

विनामास्क मुंबईकर बीएमसीच्या रडारवर, एका दिवसात 27 लाखांची दंडवसुली
मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका? इमारत सील होणार, कुणालाही प्रवेश नाही, वाचा पालिका आयुक्तांचे निर्देश

काल (शुक्रवार 19 फेब्रुवारी) एका दिवसातच मुंबईभरातील 24 वॉर्ड मध्ये 13,592 जणांवर कारवाई करण्यात आली. (Mumbai Without Mask BMC)

अनिश बेंद्रे

|

Feb 20, 2021 | 12:33 PM

मुंबई : राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा डोकं वर काढत असताना नागरिकांकडूनही काहीशी हलगर्जी बाळगली जात आहे. विनामास्क फिरणाऱ्या मुंबईकरांववर महापालिकेने कारवाईचा धडाका लावला आहे. शुक्रवारच्या एका दिवसातच बीएमसीकडून तब्बल 27 लाख 18 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. (Mumbai Without Mask Citizens BMC takes action)

आतापर्यंत विनामास्क फिरणाऱ्या मुंबईकरांकडून 31 कोटी 79 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. काल (शुक्रवार 19 फेब्रुवारी) एका दिवसातच मुंबईभरातील 24 वॉर्ड मध्ये 13,592 जणांवर कारवाई करण्यात आली. एका दिवसात पालिकेकडून 27 लाख 18 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सर्वाधिक कारवाई कोणत्या भागात?

सर्वात जास्त कारवाई के वेस्ट- अंधेरी पश्चिम भागात करण्यात आली. या ठिकाणी एका दिवसांत 1253 जणांवर कारवाई करण्यात आली. एकट्या अंधेरी पश्चिम विभागातून अडीच लाखांचा दंड गोळा करण्यात आला.

आतापर्यंत किती दंड?

मुंबईत आतापर्यंतच्या कोरोनाकाळात एकूण 15 लाख 71 मुंबईकरांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत एकूण 31 कोटी 79 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

विशेष मार्शल नेमून प्रवाशांवर कारवाई

मुंबईतील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर आणि लोकल प्रवास खुला झाल्यानंतर गर्दी वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात कोरोना संक्रमण वाढण्याची भीतीही निर्माण झाली आहे. त्याला वेळीच आवर घालण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिकेने नव्याने आढावा सुरु केला आहे. मुंबई महापालिकेकडून लोकल प्रवासात मास्कचा वापर न करणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष मार्शल नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Mumbai Without Mask Citizens BMC takes action)

मुंबईतील चार भागात वाढती रुग्णसंख्या 

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुंबईतील के ईस्ट (अंधेरीपूर्व जोगेश्वरी), टी वॉर्ड (मुलुंड), आर सेंट्रल (बोरिवली), एम वेस्ट (चेंबूर, टिळक नगर) या भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं सांगितलं. हे चारही वॉर्ड कोरोनाचे हॉटस्पॉट ठरताना दिसत आहेत. मुंबईत दररोज कोरोना रुग्णांची संख्या 10 ते 15 टक्क्याने वाढत असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

मुंबईतल्या चार वॉर्डात कोरोना रुग्णसंख्या वाढली, इमारतींना नोटीसा; पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये!

मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढण्याची भीती, विनामास्क प्रवाशांवर रेल्वेतही कारवाई

(Mumbai Without Mask Citizens BMC takes action)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें