AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुटुंब बाहेरगावी जाताच चार वॉचमनमध्ये कट शिजला, नवी मुंबईत 25 लाखांची घरफोडी,

एक आठवड्यापूर्वी सीवूड्स सेक्टर 44 मधील बालकृष्ण हाऊसिंग सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये चार सुरक्षा रक्षकांनी घरफोडीची योजना आखली होती. तिथे राहणारे जैन कुटुंब काही दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते.

कुटुंब बाहेरगावी जाताच चार वॉचमनमध्ये कट शिजला, नवी मुंबईत 25 लाखांची घरफोडी,
नवी मुंबईत घरफोडी
| Edited By: Anish Bendre | Updated on: Oct 03, 2021 | 10:14 AM
Share

नवी मुंबई : 25 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेलेल्या चार आरोपींपैकी दोघांना अटक करून नवी मुंबईतील एनआरआय कोस्टल पोलिसांनी मोठ्या घरफोडी प्रकरणाचा शोध लावला आहे. आतापर्यंत 21 लाख रुपयांहून अधिक किमतीचा चोरीचा माल आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. हे दोघे नेपाळमध्ये जाणार होते त्याआधी पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिस उपायुक्त (झोन 1) विवेक पानसरे यांनी सांगितले, की सुमारे एक आठवड्यापूर्वी सीवूड्स सेक्टर 44 मधील बालकृष्ण हाऊसिंग सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये चार सुरक्षा रक्षकांनी घरफोडीची योजना आखली होती. तिथे राहणारे जैन कुटुंब काही दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते. नंदलाल जैन यांच्या घरी डिलिव्हरी बॉय म्हणून गेलेले आरोपी नवीन रतन विश्वकर्मा आणि कामी भक्ता गोरे हे मूळ नेपाळ येथील रहिवाशी आहेत.

25 लाख 19 हजारांचा मुद्देमाल चोरीला

फिर्यादी संदीप जैन यांच्या तक्ररीवरून 24 तासात पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी रोख रक्कम आणि सोने-चांदी अशा एकूण 25 लाख 19 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालापैकी 22 लाख 20 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सीसीटीव्हीचा डीव्हीआर काढला

अधिक चौकशीतून आरोपीविरोधात मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात एकूण 6 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले असून पुढील तपास नवी मुंबई पोलीस करत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे आरोपीने घरफोडी करण्याआधी आणि ओळख पटू नये म्हणून सीसीटीव्ही फूटेजचा डीव्हीआरही काढून घेतले आणि नंतर घरफोडी केली.

दहिसर-पुण्यातून आरोपी अटकेत

डीसीपी (झोन 1) यांच्या मार्गदर्शनाखाली, एसीपी (तुर्भे) गजानन राठोड आणि एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या पोलीस पथकाने विविध मार्गांवर काम करून अखेर दोन आरोपी सुरक्षा रक्षकांना दहिसर आणि पुणे येथून अटक केली. नवीन विश्वकर्मा (31) आणि कामी बी गोरे (36) अशी त्यांची नावे आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपींना जैन कुटुंब काही दिवसांसाठी बाहेर जाणार असल्याची पूर्व माहिती होती आणि त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या घरात घुसण्याचा कट रचला गेला. इतर दोन हव्या असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी अधिक तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या :

दारुच्या नशेत 32 वर्षीय तरुणाची पित्याला बेदम मारहाण, औरंगाबादेत वृद्धाचा मृत्यू

सोन्याची चेन घेत ऑनलाईन पैसे पाठवल्याचा बनाव, तोतया आयकर अधिकाऱ्याचा 1.8 लाखांना गंडा

नवी मुंबईत मौजमस्ती करण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून वाहन चोऱ्या

Follow Us
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...