सोन्याची चेन घेत ऑनलाईन पैसे पाठवल्याचा बनाव, तोतया आयकर अधिकाऱ्याचा 1.8 लाखांना गंडा

आयकर अधिकारी असल्याचे सांगत एका भामट्याने भंडाऱ्यातील एका सराफा व्यापाऱ्याला 1 लाख 80 हजार रुपयांनी गंडवले आहे. ही लूट त्याने मोबाईलवरुन ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट दाखवून केली आहे.

सोन्याची चेन घेत ऑनलाईन पैसे पाठवल्याचा बनाव, तोतया आयकर अधिकाऱ्याचा 1.8 लाखांना गंडा
तोतया आयकर अधिकारी
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Oct 03, 2021 | 9:09 AM

भंडारा : भंडारा शहरात तोतया आयकर अधिकाऱ्याने सराफा व्यापाऱ्याला गंडा घातला. सोन्याची खरेदीचे ऑनलाईन पैसे पाठवल्याचे बनावट स्क्रीनशॉट दाखवत फसवणूक करण्यात आली. फसवणुकीच्या नव्या फंड्यामुळे पोलिससुद्धा अचंबित झाले आहेत.

काय आहे प्रकरण?

आयकर अधिकारी असल्याचे सांगत एका भामट्याने भंडाऱ्यातील एका सराफा व्यापाऱ्याला 1 लाख 80 हजार रुपयांनी गंडवले आहे. ही लूट त्याने मोबाईलवरुन ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट दाखवून केली आहे. ही घटना भंडारा येथील अनादिनारायण ज्वेलर्समध्ये घडली. या प्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फसवणुकीच्या नव्या फंड्यामुळे पोलिससुद्धा अचंबित झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

भंडारा येथील मेन लाईनमध्ये कमला हाऊसमध्ये अनादिनारायण ज्वेलर्स आहे. त्यांच्या दुकानात आलेल्या ग्राहकाने आपण आयकर अधिकारी असल्याचे खोटे सांगितले. सोने खरेदी करायचे आहे, असे सांगत त्याने सोन्याची चेन आणि अंगठीची पाहणी केली. सोन्याची चेन आणि दोन अंगठ्या (वजन 27.49 ग्रॅम) खरेदी केल्या.

पैसे पाठवल्याचा खोटा स्क्रीनशॉट

एकूण किमतीपैकी 1 लाख 80 हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवरुन करण सोनी यांच्या मोबाईलवर पाठवले. पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉटही दाखवण्यात आला. त्यावर विश्वास ठेवून 25.490 ग्रॅम सोन्याची चेन देण्यात आली, तर अंगठ्या रविवारी घेऊन जाईन, असे त्याने सांगितले. खरेदीचे बिलही रविवारीच घेऊन जाईन, असे सांगून तो निघून गेला.

अकाऊंटमध्ये पैसेच ट्रान्सफर नाहीत

काही वेळाने सोनी यांनी आपले अकाऊंट स्टेटमेंट चेक केले असता, त्यात कोणतीच रक्कम जमा झाली नसल्याचे दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी त्याचा शोध घेतला, परंतु तो आढळून आला नाही. अखेर रात्री भंडारा पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्यात आली. त्यावरुन पोलिसांनी तोतया आयकर अधिकारी संतोष पी. नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भंडारा शहर पोलिस त्याच्या शोध घेत आहेत.

पुण्यात प्रसिद्ध ज्वेलरला गंडा

दरम्यान, चंदिगढमध्ये व्यवसाय सुरु करुन देण्यासाठी 50 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने प्रसिद्ध सराफ व्यावसायिक पु. ना. गाडगीळ यांना 1 कोटी 60 लाख 50 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार जानेवारी महिन्यात उघडकीस आला होता. या प्रकरणी सौरभ विद्याधर गाडगीळ (वय 43) यांनी पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

संबंधित बातम्या :

पुण्यात पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सला 1 कोटी 60 लाखांचा गंडा, गुन्हा दाखल

सातारा-पंढरपूर एसटीवर दरोडा प्रकरण, 4 जणांवर गुन्हा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें