सातारा-पंढरपूर एसटीवर दरोडा प्रकरण, 4 जणांवर गुन्हा

सातारा-पंढरपूर एसटीवर दरोडा प्रकरण, 4 जणांवर गुन्हा

याप्रकरणी माळशिरस पोलीस स्टेशनमध्ये फक्त चार अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nupur Chilkulwar

|

Jan 20, 2021 | 9:31 AM

पंढरपूर : सातारा-पंढरपूर एसटी बसवर 10 ते 12 दरोडेखोरांनी दगडफेक केली (Satara-Pandharpur ST Bus Attack). त्यानंतर दरोडेखोरांनी एसटीवर ताबा मिळवला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. माळशिरसजवळील पिलीव घाटात ही घटना घडली. याप्रकरणी माळशिरस पोलीस स्टेशनमध्ये फक्त चार अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 394, 427 आणि सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Satara-Pandharpur ST Bus Attack).

यामध्ये एसटी चालक, मोटारसायकल चालक आणि बसमधील काही प्रवाशी जखमी झाले. तसेच, दगडफेकीमुळे एसटीच्या काचा फुटून मोठं नुकसान झालं.

नेमकं काय घडलं?

मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सातारा-पंढरपूर रस्त्यावरील म्हसवड जवळच्या पिलीव घाटात 10 ते 12 अज्ञात दरोडखोरांनी एसटी आणि मोटरसायकल चालकावर दगडफेक केली. यामध्ये बसच्या काचा फुटल्या. मोटरसायकल चालक, बसमधील प्रवासी आणि बसचालक जखमी झाले. त्यानंतर या दरोडेखोरांनी गाडी थांबवत त्यावर ताबा मिळवला. तसेच, एसटीतील प्रवाशांना मारहाणसुद्धा करण्यात आली. या घटनेत एसटीच्या काचा फुटून मोठं नुकसान झालं.

Satara-Pandharpur ST Bus

पंढरपूरमधून साताऱ्याकडे एसटी जात असताना ही घटना घडली. पंढरपूर-सातारा रस्ता दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला. ही घटना सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत घडली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच माळशिरस व म्हसवड पोलिस घटनास्थळी रवाना झाले.

दरोड्याच्या उद्देशाने झुडपात लपून बसलेल्या हुल्लडबाजांनी ये-जा करणाऱ्या गाड्यांवर दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच, एसटीवर ही दगडफेक झाली असून, गाडीच्या काचा फुटल्या आहेत. माळशिरस आणि म्हसवड पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. पंढरपूर-सातारा परिसरात कोंबिंग ऑपरेशन सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली आहे.

Satara-Pandharpur ST Bus Attack

संबंधित बातम्या :

सातारा-पंढरपूर एसटी बसवर हुल्लडबाजांनी दगडफेक केल्यानं खळबळ

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें