AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन वाझेवर ओपन हार्ट सर्जरी, वोकहार्ट रुग्णालयाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था

सचिन वाझेची प्रकृती स्थिर आहे. कार्डिअॅक सर्जन डॉ कमलेश जैन आणि कार्डिओलॉजिस्ट डॉ अंकुर आणि डॉ केदार यांच्या टीमने वाझेवर शस्त्रक्रिया केली. रुग्णालयाबाहेर सध्या कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

सचिन वाझेवर ओपन हार्ट सर्जरी, वोकहार्ट रुग्णालयाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था
Sachin Vaze
| Edited By: Anish Bendre | Updated on: Sep 14, 2021 | 3:45 PM
Share

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेर सापडलेले स्फोटक प्रकरण (Mukesh Ambani Antilia Bomb Scare) आणि मनसुख हिरेन हत्या (Mansukh Hiren) प्रकरणी अटकेत असलेला निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) याची ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली आहे. कोर्टाच्या परवानगीनंतर वाझेवर मुंबई सेंट्रलमधील वोकहार्ट रुग्णालयात (Wockhardt Hospitals) सर्जरी करण्यात आली. शस्त्रक्रियेसाठी वाझे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्याची माहिती कालच त्याच्या वकिलांनी दिली होती.

सचिन वाझेची प्रकृती स्थिर

वाझेच्या हृदयावर शस्त्रक्रियेची गरज जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केल्याचा दावा, वकिलांनी याआधी कोर्टात केला होता. त्यानुसार सोमवारी सचिन वाझे मुंबई सेंट्रलमधील वोकहार्ट रुग्णालयात दाखल झाला होता. आज (मंगळवार 14 सप्टेंबर 2021) वाझेवर ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. सचिन वाझेची प्रकृती स्थिर आहे. कार्डिअॅक सर्जन डॉ कमलेश जैन आणि कार्डिओलॉजिस्ट डॉ अंकुर आणि डॉ केदार यांच्या टीमने वाझेवर शस्त्रक्रिया केली. रुग्णालयाबाहेर सध्या कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

…म्हणून अँटिलियाबाहेर स्फोटकांची गाडी ठेवली

दरम्यान, सचिन वाझेने मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी का ठेवली, याचं उत्तर अखेर मिळालं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने कोर्टात तब्बल दहा हजार पानांची चार्जशीट दाखल केली आहे. यामध्ये सचिन वाझेने स्फोटकांची गाडी का ठेवली, त्याची कारणं मिळाली आहेत. सचिन वाझेला आपली जुनी ओळख परत मिळवायची होती. स्फोटकांनी भरलेल्या कारचा तपास करुन, उत्तम तपास अधिकारी म्हणून पुन्हा लौकिक मिळेल, अशी आशा सचिन वाझेला होती, मात्र इथेच तो फसला आणि जेलमध्ये गेला.

ओळख परत मिळवण्यासाठी ‘कार’नामा

सचिन वाझे हा ख्वाजा युनूस एन्काउंटर प्रकरणात निलंबित झाला होता. मात्र ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर 2020 मध्ये तो परत पोलीस दलात दाखल झाला. वाझेला थेट क्राईम इन्वेस्टीगेशन युनिट अर्थात CIU चे प्रमुख पद मिळालं. नव्वदच्या दशकातील ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट‘ अशी ख्याती असलेला सचिन वाझे जवळपास 16 वर्षांनंतर 2020 मध्ये पोलिस दलात परतला होता. मात्र मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर, त्याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं.

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर 24 फेब्रुवारी 2021 च्या रात्री स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ उभी करण्यात आली होती. ही गाडी सचिन वाझेचा मित्र मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचीच होती.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण नेमकं काय?

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 24 फेब्रुवारी 2021 च्या रात्री स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळली होती. ती स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची होती. मात्र मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्च 2021 रोजी मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला होता. ही हत्या असल्याचा दावा करत NIA ने सचिन वाझे याला अटक केली. सध्या तो कोठडीत आहे.

मनसुख हिरेन यांची हत्या घडली त्या रात्री नेमकं काय घडलं, याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले. त्या रात्री आरोपींनी हिरेन यांच्या नाकावर जबरदस्ती क्लोरोफॉर्म टाकलं. त्यामुळे हिरेन तात्काळ बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपींनी त्यांची हत्या केल्याचं सूत्रांनी सांगितलं. पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार हत्येपूर्वी हिरेन यांच्या चेहऱ्यावर मार लागलेला होता. त्यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला मार लागलेला होता. मृत्यूपूर्वी हा मार लागलेला होता. तसेच त्यांच्या अंगावर काही ठिकाणी मार होता. विशेषत: डोक्यालाही मार लागलेला होता, असं सूत्रांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

कुटुंबाला भेटण्यासह सचिन वाझेच्या तीन मागण्या, NIA च्या विशेष न्यायाधीशांचा निर्णय काय?

अंतर ठेवून बसा, कोर्टात सचिन वाझे-सुनील मानेचा बोलण्याचा प्रयत्न, न्यायाधीशांनी फटकारलं

NIA कडून सचिन वाझे-सुनील मानेच्या कोठडीची मागणी, वाझेचे वकील म्हणतात ओपन हार्ट सर्जरीची गरज

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...