AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाकातली नथनी दाखवा, पैंजण घेऊन महिला पसार, सीसीटीव्हीत चोरी कैद

मुंबईत सध्या महिला चोरांची एक गँग सक्रिय आहे. या गँगमधील महिला ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये जाऊन दागिने विकत घेण्याच्या बहाण्याने दुकानदाराशी संपर्क साधतात आणि चोरी करून फरार होतात (Mumbai Police arrest two woman who theft jewellers from Jewellery shops).

नाकातली नथनी दाखवा, पैंजण घेऊन महिला पसार, सीसीटीव्हीत चोरी कैद
नाकातली नथनी दाखवा, पैंजण घेऊन महिला पसार, सीसीटीव्हीत चोरी कैद
| Edited By: Chetan Patil | Updated on: Jun 23, 2021 | 4:23 PM
Share

मुंबई : मुंबईत सध्या महिला चोरांची एक गँग सक्रिय आहे. या गँगमधील महिला ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये जाऊन दागिने विकत घेण्याच्या बहाण्याने दुकानदाराशी संपर्क साधतात आणि चोरी करून फरार होतात. अखेर या गँगमधील दोन महिला चोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलीस आणखी तिसऱ्या महिलेचा शोध घेत आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या महिलांचे नाव सुगंधाबाई मकाले (वय 60 वर्ष) आणि उषाबाई मकाले (वय 58 वर्ष) असं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कांदिवली पोलीस करत आहेत (Mumbai Police arrest two woman who theft jewellers from Jewellery shops).

नेमकं प्रकरण काय?

कांदिवली पश्चिमेतील मंगलमूर्ती ज्वेलर्स या दुकानात सोमवारी (21 जून) सकाळी दहा वाजेच्या सुमारास एका पाठोपाठ तीन महिला आल्या. त्यांनी दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश केला. या तीन महिलांपैकी एका महिलेने दुकानदारास नाकातील नथनी दाखवण्यास सांगितलं. त्यानंतर तिने पायातील पैंजण दाखवण्यास सांगितलं. दुकानदार पैंजणाचं वजन करण्यासाठी गेला तेव्हा एका महिलेने पैंजण चोरी करुन साडीमध्ये लपवले. त्यानंतर ती दागिने विकत न घेता निघून गेली.

सीसीटीव्हीत महिलांची चोरी कैद

संबंधित महिलेसह इतर दोन महिलाही लागोलग दुकानात निघून गेल्या. थोड्या वेळाने दुकानदाराला महिलांवर संशय आला. त्याने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता महिलांची चोरी निदर्शनास आली. त्याने तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. सीसीटीव्हीत महिलांची लाईव्ह चौरी कैद झालेली होती (Mumbai Police arrest two woman who theft jewellers from Jewellery shops).

आरोपी महिलांना बेड्या

कांदिवली पोलिसांनी संबंधित सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर तपासाला सुरुवात केली. अखेर या गँगमधील दोन महिलांना अटक करण्यात कांदिवली पोलिसांना यश आलं. या महिलांची आणखी एक सहकारी फरार आहे. तिचाही शोध पोलीस घेत आहेत.

आरोपी महिला या नाशिकहून मुंबईमध्ये फक्त चोरी करण्यासाठी येत. ते दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने ज्वेलर्समध्ये जात. तिथे दुकानदाराला फसवून चोरी करुन पसार होत, अशी माहिती पोलिसांनी दिली. या महिलांनी अशाप्रकारे अनेक ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये चोरी केल्याचं उघड झालं आहे, अशीही माहिती आता समोर येत आहे.

हेही वाचा : विवाहबाह्य संबंधातून नागपुरात पत्नीच्या प्रियकराची हत्या, नाल्याचं पाणी लालेलाल

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!