विवाहबाह्य संबंधातून नागपुरात पत्नीच्या प्रियकराची हत्या, नाल्याचं पाणी लालेलाल

तरुणावर हल्ला झाल्यामुळे त्याच्या रक्ताने नाग नदीचं पात्र लालेलाल झाल्याचं पाहायला मिळालं. हत्येच्या थराराची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे

विवाहबाह्य संबंधातून नागपुरात पत्नीच्या प्रियकराची हत्या, नाल्याचं पाणी लालेलाल
नाल्यात उतरवून तरुणाच्या हत्येचा थरार

नागपूर : नागपुरात हत्यांचं सत्र थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील शिवाजी नगर परिसरात भरदिवसा योगेश धोंगडे नावाच्या युवकाची हत्या करण्यात आली. अनैतिक संबंधातून ही हत्या झाली असण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आरोपीने तरुणाला नाल्यात उतरवून धारदार शस्त्राने वार केले. यावेळी त्याच्या रक्ताने नाल्याचे पाणी लालेलाल झाले. बघ्यांनी या घटनेचा व्हिडीओ शूट केला, मात्र कोणीही मदतीला न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Nagpur Man killed out of Extra Marital Affair)

कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाने आत्महत्या करण्याचा प्रकार नागपुरात ताजा असतानाच भरदिवसा शिवाजी नगर परिसरात आणखी एक हत्या घडली. आरोपी गोलू धोटे याच्या पत्नीशी त्याच परिसरात राहणाऱ्या योगेश धोंगडे याचे विवाहबाह्य संबंध असल्याचं बोललं जातं.

तरुणावर धारदार शस्त्राने वार

आरोपीने योगेशला बोलण्यासाठी नाग नाल्याजवळ बोलावलं होतं. यावेळी दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला, की गोलूने त्याला नाल्यात उतरवत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. विशेष म्हणजे अनेक जण हा प्रकार बघत राहिले होते. त्यांनी या घटनेचा व्हिडीओही शूट केला. त्यानंतर आरोपी पसार झाला.

दरम्यान, तरुणावर हल्ला झाल्यामुळे त्याच्या रक्ताने नाग नदीचं पात्र लालेलाल झाल्याचं पाहायला मिळालं. हत्येच्या थराराची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

मेव्हणीला चाकूचा दाखवत अतिप्रसंग?

दुसरीकडे, नागपुरात राहणाऱ्या आलोक माटूरकर याने पत्नी, दोन मुलं, सासू आणि मेव्हणी अशा पाच जणांची हत्या करुन आत्महत्या केली होती. सोमवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. मात्र काही तासातच या प्रकरणात नवीन बाबी पुढे येताना दिसत आहेत. आरोपी आलोक माटूरकरने हत्या करण्यापूर्वी मेव्हणीला चाकूचा दाखवत अतिप्रसंग केल्याचा संशय आहे. त्यानंतर त्याने तिचा गळा कापला असावा. भाऊजी घरात शिरताच काहीतरी करेल याचा अंदाज आल्याने मेहुणीने मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग सुरु केले होते. त्यात त्यांच्या संघर्षाचा आवाजही रेकॉर्ड झाल्याची माहिती आहे.

हत्येचा कट आधीपासूनच रचला

इतकंच नाही तर आरोपीने हत्येचा प्लान आधीपासूनच आखला होता त्यासाठी त्याने ऑनलाईन चाकू मागवले होते. ते त्याच्या मुलीच्या नावाने आल्याचं पुढे आलं आहे. आरोपी हा महिलांना वश करण्याची विद्या घेत होता, असंही समोर येत आहे. मात्र त्याचा उपयोग त्याने यात केला की नाही याची माहिती घेतली जात आहे. पोलिसांनी यातील अनेक घटनांना दुजोराही दिला मात्र तपास सुरू असल्याने त्यावर पोलीस विशेष बोलण्याचं टाळत आहेत.

नागपूरला हादरवणाऱ्या या घटनेचा तपास पोलीस सगळ्याच बाजूने करत आहेत. यात नेमकं काय झालं आणि कोणती अशी कारणं होती की सर्वसाधारण व्यक्तीने आपल्या जवळच्या पाच जणांची मोठ्या निर्दयतेने हत्या केली, आणि आत्महत्याही केली, याचं पोलिसांसमोर आव्हान आहे. शव विच्छेदन अहवाल पुढे आल्यानंतर अनेक बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

पत्नी, मुलं, सासू, मेहुणीसह 5 जणांची हत्या करुन पतीची आत्महत्या! धक्कादायक घटनेनं नागपूर हादरलं

कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यापूर्वी मेव्हणीवर अतिप्रसंग? नागपुरातील हत्याकांडात नवा ट्विस्ट

(Nagpur Man killed out of Extra Marital Affair)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI