Breaking : पत्नी, मुलं, सासू, मेहुणीसह 5 जणांची हत्या करुन पतीची आत्महत्या! धक्कादायक घटनेनं नागपूर हादरलं

एका व्यक्तीनं पत्नी, मुलं, सासू आणि मेहुणीची हत्या करुन आत्महत्या केल्याची घटना दुपारच्या सुमारास घडलीय. या हत्याकांडामागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडलं का? याचा तपास आता नागपूर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Breaking : पत्नी, मुलं, सासू, मेहुणीसह 5 जणांची हत्या करुन पतीची आत्महत्या! धक्कादायक घटनेनं नागपूर हादरलं

नागपूर : उपराजधानी नागपूर हत्याकांडाच्या घटनेनं पुन्हा एकदा हादरलं आहे. एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करुन एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरातील पाचपावली परिसरात घडलीय. एका व्यक्तीनं पत्नी, मुलं, सासू आणि मेहुणीची हत्या करुन आत्महत्या केल्याची घटना दुपारच्या सुमारास घडलीय. या हत्याकांडामागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडलं का? याचा तपास आता नागपूर पोलिसांकडून करण्यात येत आहे. आलोक पातुरकर असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नावं असल्याची माहिती मिळतेय. या व्यक्तीने आधी आपल्या कुटुंबातील पत्नी, मुलं, सासू आणि मेहुणीची हत्या केली आणि त्यानंतर आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांकडून मिळतेय. (One person commits suicide by killing 5 members of the same family in Nagpur)

नागपुरातील हे हत्याकांड दुपारी साडे बाराच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल
जाले. त्यांनी 6 मृतदेह ताब्यात घेतले आहेत. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आलोक पातुरकर हा शिलाई काम करत होता. त्याचा संपूर्ण परिवार प्रमोद भिसीकर यांच्या घरी भाड्याने राहत होता. प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, केवळ कौटुंबिक वादातून 5 जणांची हत्या आणि स्वत: जीव संपवण्याच्या या प्रकाराचा पोलीस कसून तपास करत आहेत. यामागे अन्य काही कारण असू शकेल का? याचाही तपास नागपूर पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या :

ना मी जिवंत राहणार, ना तुला जगू देणार, प्रेयसीवर गोळीबार करुन युवकाची आत्महत्या

विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या, 23 वर्षीय विवाहितेला बेड्या

One person commits suicide by killing 5 members of the same family in Nagpur