AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना मी जिवंत राहणार, ना तुला जगू देणार, प्रेयसीवर गोळीबार करुन युवकाची आत्महत्या

तरुणीच्या घरात घुसून आरोपीने 'ना मी जिवंत राहणार, ना तुला जगू देणार' असं धमकावलं. तरुणाने आधी तरुणीवर गोळीबार केला, त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून घेतली.

ना मी जिवंत राहणार, ना तुला जगू देणार, प्रेयसीवर गोळीबार करुन युवकाची आत्महत्या
बंदूक - प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Jun 21, 2021 | 12:55 PM
Share

भोपाळ : ‘ना मी जिवंत राहणार, ना तुला जगू देणार’ असं म्हणत तरुणाने आधी प्रेयसीवर गोळीबार केला, त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. तरुणी जखमी असून तरुणाचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये तरुणीच्या घरात घुसून आरोपी प्रियकराने गोळीबार केला होता. (Madhya Pradesh Man fires at Girlfriend kills self later)

तरुणीचा विवाह अन्यत्र ठरवल्याने चिंतीत

संबंधित युवक आणि युवती एकाच कंपनीत काम करत होते. लॉकडाऊनच्या आधी दोघांची मैत्री झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर दोघांमध्ये निर्माण झालेल्या प्रेम प्रकरणातून तरुणाने टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तरुणीचा विवाह अन्य तरुणासोबत ठरला होता. तिचा साखरपुडाही झाला होता. त्यामुळे तरुण चिंतीत होता. शनिवारी रात्री उशिरा तरुणीच्या घरात घुसून आरोपीने ‘ना मी जिवंत राहणार, ना तुला जगू देणार’ असं धमकावलं. तरुणाने आधी तरुणीवर गोळीबार केला, त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून घेतली.

तरुणीच्या जीवाचा धोका टळला

हल्ल्यात गोळी तरुणीच्या कानाला चाटून गेली. त्यामुळे तिच्या प्रकृतीचा धोका टळला, मात्र तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलीस दोघांच्याही कुटुंबीयांकडे चौकशी करत आहेत. दोघांना एकमेकांशी विवाह करण्याची इच्छा होती. तरुणाने तिला अंगठीही भेट दिली होती. मात्र तिच्या कुटुंबीयांनी तिचं लग्न अन्यत्र जमवल्याने तरुणाचा राग अनावर झाला आणि त्याने दोघांनाही संपवण्याचा निर्णय घेतला, असं तपासात समोर येत आहे.

औरंगाबादमध्ये विवाहाला मान्यतेनंतरही युगुलाची आत्महत्या

दरम्यान, ज्या प्रियकरासोबत विवाह करण्याचं नियोजन झालं होतं, त्या मुलानेच आत्महत्या केल्यामुळे तणावातून 17 वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. 17 वर्षीय तरुणी पदवीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. गेल्या काही दिवसांपासून ती पार्लरमध्येही काम करत होती. तिथे तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. दोघांना विवाह करायचा होता. यासाठी दोघांनी आपापल्या कुटुंबीयांनाही राजी केले होते.

15 दिवसांपूर्वी प्रियकराने आयुष्य संपवलं

तीन महिन्यांपूर्वी दोघांचा विवाहही ठरवण्यात आला होता. मात्र विवाह ठरलेल्या तरुणाने 15 दिवसांपूर्वी अचानक टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. यामुळे खुशीही दोन आठवड्यांपासून मानसिक तणावात होती. अखेर तिने राहत्या घरात सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली.

संबंधित बातम्या :

धावत्या ट्रेनमध्ये प्रेयसीची चाकू भोसकून हत्या, सात दिवसात तुरुंगात प्रियकराची आत्महत्या

विवाहाला मान्यतेनंतरही औरंगाबादेत प्रियकराची आत्महत्या, अल्पवयीन प्रेयसीचाही गळफास

(Madhya Pradesh Man fires at Girlfriend kills self later)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.