विवाहाला मान्यतेनंतरही औरंगाबादेत प्रियकराची आत्महत्या, अल्पवयीन प्रेयसीचाही गळफास

ज्या प्रियकरासोबत विवाह करण्याचं नियोजन झालं होतं, त्या मुलानेच आत्महत्या केल्यामुळे तणावातून 17 वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

विवाहाला मान्यतेनंतरही औरंगाबादेत प्रियकराची आत्महत्या, अल्पवयीन प्रेयसीचाही गळफास
अल्पवयीन तरुणीची आत्महत्या
दत्ता कानवटे

| Edited By: अनिश बेंद्रे

Jun 21, 2021 | 8:35 AM

औरंगाबाद : ज्या तरुणासोबत विवाह ठरला होता, त्यानेच आत्महत्या केल्यामुळे अल्पवयीन प्रेयसीनेही आपलं आयुष्य संपवलं. अवघ्या 15 दिवसांच्या अंतराने या युगुलाने जीवनाची अखेर केली. राहत्या घरात गळफास घेत अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. औरंगाबाद जिल्ह्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (Aurangabad Minor Girl commits Suicide after Fiancé ends life)

17 वर्षीय मुलीचं टोकाचं पाऊल

ज्या प्रियकरासोबत विवाह करण्याचं नियोजन झालं होतं, त्या मुलानेच आत्महत्या केल्यामुळे तणावातून 17 वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. ही घटना शनिवार 19 जून रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 वर्षीय खुशी रमेश कलवले ही औरंगाबादमधील गायकवाड हौसिंग सोसायटी, एकता नगर, जाटवडा रोड भागात राहत होती. ती पदवीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. गेल्या काही दिवसांपासून ती पार्लरमध्येही काम करत होती.

15 दिवसांपूर्वी प्रियकराची आत्महत्या

खुशीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघांना विवाह करायचा होता. यासाठी दोघांनी आपापल्या कुटुंबीयांनाही राजी केले होते. तीन महिन्यांपूर्वी दोघांचा विवाहही ठरवण्यात आला होता. मात्र विवाह ठरलेल्या तरुणाने 15 दिवसांपूर्वी अचानक टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. यामुळे खुशीही दोन आठवड्यांपासून मानसिक तणावात असल्याचं बोललं जातं.

स्वयंपाकघरातील फॅनला तरुणीचा साडीने गळफास

शनिवार 19 जून रोजी दुपारी खुशीची आई घराबाहेर दळण करत होती. त्यावेळी खुशीने स्वयंपाकघरात सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही बाब आईच्या लक्षात येताच इतर नागरिकांच्या मदतीने तिने खुशीला घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव जाधव करत आहेत.

संबंधित बातम्या :

धावत्या ट्रेनमध्ये प्रेयसीची चाकू भोसकून हत्या, सात दिवसात तुरुंगात प्रियकराची आत्महत्या

गर्भवती प्रेयसीवर 12 तास सामूहिक बलात्कार, दु:ख सहन न झाल्याने प्रियकराची आत्महत्या

(Aurangabad Minor Girl commits Suicide after Fiancé ends life)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें