AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गर्भवती प्रेयसीवर 12 तास सामूहिक बलात्कार, दु:ख सहन न झाल्याने प्रियकराची आत्महत्या

राजस्थानच्या बांसवाडा येथे एका गरोदर महिलेवर 12 तासांपर्यंत सामुहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली होती. या घटनेचं दु:ख सहन न झाल्याने पीडित महिलेच्या प्रियकराने आत्महत्येचं पाऊल उचललं.

गर्भवती प्रेयसीवर 12 तास सामूहिक बलात्कार, दु:ख सहन न झाल्याने प्रियकराची आत्महत्या
| Edited By: | Updated on: Aug 14, 2019 | 12:16 PM
Share

जयपूर : राजस्थानच्या बांसवाडा येथे एका गरोदर महिलेवर 12 तासांपर्यंत सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली होती. या घटनेचं दु:ख सहन न झाल्याने पीडित महिलेच्या प्रियकराने आत्महत्येचं पाऊल उचललं. या घटनेनंतर पोलिसांना महिलेसोबत बलात्कार झाल्याचं कळालं. आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव प्रभू आहे. प्रभू आणि त्याच्या प्रेयसीचं लग्नही ठरलं होतं.

एका तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या आत्महत्येमागील कारण जाणून घेण्यासाठी तपास सुरु केला. यादरम्यान हा सर्व प्रकार उघडकीस आला. तपासाअंती होणाऱ्या बायकोसोबत सामूहिक बलात्कार झाल्याने प्रभूला हे दु:ख सहन झालं नाही आणि त्याने आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं.

गेल्या 13 जुलैला प्रभू त्याच्या होणाऱ्या बायकोसोबत बाहेर फिरायला गेला होता. यादरम्यान त्यांच्यावर काही अज्ञातांनी हल्ला केला. त्यानंतर हे आरोपी प्रभू आणि पीडितेला एका अज्ञात ठिकाणी घेऊन गेले. इथे दोन तरुण आधीच उपस्थित होते. यावेळी प्रभूला जबर मारहाण करण्यात आली. तर पीडितेवर अनेकवेळा बलात्कार करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी या दोघांनाही रस्त्याच्या कडेला फेकलं आणि तिथून पळ ठोकला.

यानंतर पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे ती आधीच गर्भवती असल्याचं समोर आलं. तिच्यासोबत झालेला बलात्कार आणि मारहाणीमुळे तिचा गर्भपात झाला होता. इतकं सगळं होऊनही प्रभूने पोलिसांत तक्रार केली नाही, तर त्याने पीडितेची समजूत काढत तिला घरी नेले. पण, झालेल्या प्रसंगाने तो हेलावून गेला होता. त्याला हे दु:ख सहन झालं नाही आणि अखेर त्याने स्वत:चे जीवन संपवले.

पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कारवाई करत या गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. या पाचही जणांवर आधीपासून चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

संबंधित बातम्या :

अंगावर उकळतं तेल ओतलं, मित्राच्या मदतीने पत्नीचा पतीवर जीवघेणा हल्ला

मेट्रो कर्मचाऱ्याची फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या, व्हिडीओ पाहून मित्राला धक्का

घटस्फोटित पत्नीच्या बॉयफ्रेण्डची हत्या, मुंबईत तरुणाला बेड्या

नोकरीसाठी बहिण शहरात पाठवली, भावाला वेश्यालयात सापडली

महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.