घटस्फोटित पत्नीच्या बॉयफ्रेण्डची हत्या, मुंबईत तरुणाला बेड्या

घटस्फोटित पत्नीचं प्रेम प्रकरण असल्याचं समजल्यामुळे चिडलेल्या तरुणाने तिच्या बॉयफ्रेण्डची हत्या केली. मात्र पोलिसांनी अवघ्या तीन तासात आरोपींना गजाआड केलं

घटस्फोटित पत्नीच्या बॉयफ्रेण्डची हत्या, मुंबईत तरुणाला बेड्या

मुंबई : घटस्फोटित पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्या प्रकरणी मुंबईत 27 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील गोवंडी (Govandi Murder) परिसरात शनिवारी पहाटेच्या सुमारास 23 वर्षीय समिउल्लाह फारुकीची हत्या झाली होती.

हत्येनंतर अवघ्या तीन तासात मालवणी पोलिसांनी आरोपी झुबेर खानच्या मुसक्या आवळल्या. भायखळा भागात राहणारा समिउल्लाह फारुकी आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी शिवाजीनगरला आला होता. त्यावेळी चार ते पाच जणांनी त्याचा जीव घेतला.

समिउल्लाह फारुकीची प्रेयसी ही आधी झुबेरची पत्नी होती. गेल्या वर्षी दोघांचा घटस्फोट झाला. समिउल्लाह तिला भेटण्यासाठी आला असल्याचं पाहून झुबेर चिडला. घटस्फोटित पत्नीचं प्रेम प्रकरण असल्याचं समजल्याने झुबेरचा तीळपापड झाला.

झुबेर, त्याचा भाऊ आणि चौघांनी बेदम मारहाण करुन आणि सुरीने भोसकलं. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केल, मात्र तोपर्यंत समिउल्लाहचा मृत्यू झाला होता. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले. मात्र मालवणी पोलिसांनी अवघ्या तीन तासांत आरोपींना अटक केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *