विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या, 23 वर्षीय विवाहितेला बेड्या

गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यात कोचराब गावात ही घटना घडली होती. कचऱ्याच्या गाडीत प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेला नवजात अर्भकाचा मृतदेह 14 फेब्रुवारी रोजी सापडला होता.

विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या, 23 वर्षीय विवाहितेला बेड्या
jail
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jun 21, 2021 | 11:38 AM

अहमदाबाद : विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी तरुणीला अटक करण्यात आली आहे. अहमदाबाद पोलिसांच्या क्राईम ब्रांचने 23 वर्षीय तरुणीला रविवारी बेड्या ठोकल्या. विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या बाळाची हत्या करुन त्याचा मृतदेह कचऱ्याच्या पेटीत टाकल्याचा आरोप आहे. (Ahmedabad Mother murders baby girl born out of extra marital affair)

गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यात कोचराब गावात ही घटना घडली होती. कचऱ्याच्या गाडीत प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेला नवजात अर्भकाचा मृतदेह 14 फेब्रुवारी रोजी सापडला होता. कचरा गाडीच्या ड्रायव्हरने पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास हाती घेतला होता.

23 वर्षीय तरुणीच्या घरात पुरावे सापडले

पोलिसांनी कचऱ्याच्या गाडीचा मार्ग शोधून 23 वर्षीय संशयित तरुणीला ताब्यात घेतलं. तिचं नाव शिवानी श्रीवास्तव. तिच्या घरात गरोदरपणाशी संबंधित काही वैद्यकीय कागदपत्रंही सापडली. त्यानंतर पोलिसांनी तिला कोठडीत घेऊन कसून चौकशी केली. त्यावेळी तिने नवजात मुलीची हत्या केल्याची कबुली दिली.

तरुणासोबत अनैतिक संबंध

उत्तर प्रदेशातील मैनपुरीतील रहिवासी असलेली 23 वर्षीय शिवानी श्रीवास्तव काही महिन्यांपूर्वी पतीसह अहमदाबादला आली होती. या काळात तिचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध जुळले. त्यातूनच ती गरोदर राहिली, असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. 13 फेब्रुवारीच्या रात्री तिला प्रसुतीकळा सुरु झाल्या. पती कामावर असताना घरातच तिने मुलीला जन्म दिला.

पतीला हे समजण्याच्या भीतीने तिने मुलीची गळा दाबून हत्या केली. प्लास्टिकच्या पिशवीत अर्भकाचा मृतदेह गुंडाळून ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने तो कचऱ्याच्या गाडीत फेकला, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी तरुणीला अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे.

संबंधित बातम्या :

बस प्रवासात ओळख, खाऊ देण्याचा बहाणा, नगरच्या महिलेचे चार महिन्यांचे बाळ पुण्यात पळवले

फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबातील बाळाची चोरी; अवघ्या चार तासात चौघांना अटक

चार महिन्यांच्या बाळाला झुडपात सोडणारी पुण्याची पाषाणहृदयी आई अटकेत

(Ahmedabad Mother murders baby girl born out of extra marital affair)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें