AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDW vs AUSW Test Match: टीम इंडिया पराभवाच्या वेशीवर! प्रतिका रावलची एकाकी झुंज पण…

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकमेव कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या दुसर्‍या दिवशीच टीम इंडियाच्या पराभवाची स्क्रिप्ट लिहिली गेली आहे. भारताने दुसऱ्या दिवशी 6 गडी बाद 105 धावा केल्या. पण पराभव हा निश्चित दिसत आहे.

INDW vs AUSW Test Match: टीम इंडिया पराभवाच्या वेशीवर! प्रतिका रावलची एकाकी झुंज पण...
INDW vs AUSW Test Match: टीम इंडिया पराभवाच्या वेशीवर! प्रतिका रावलची एकाकी झुंज पण...Image Credit source: BCCI Women Twitter
| Updated on: Mar 07, 2026 | 6:50 PM
Share

भारत ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यावर ऑस्ट्रेलियाने मजबूत पकड मिळवली आहे. एकंदरीत चित्र पाहता भारतीय संघ पराभवाच्या दरीत पडणार हे निश्चित झालं आहे. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. भारताने पहिल्या डावात सर्व गडी गमवून 198 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 323 धावा केल्या. यासह ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 125 धावांची आघाडी घेतली. ही आघाडी मोडून काढताना टीम इंडियाने नांगी टाकली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा निम्म्याहून अधिक संघ तंबूत होता. भारताने दुसऱ्या दिवस अखेर 6 गडी गमवून 105 धावा केल्या आहेत. अजूनही भारत पहिल्या डावातील आघाडी मोडून काढण्यात 20 धावांनी मागे आहे. तसेच हातात फक्त 4 विकेट आहेत. त्यामुळे तिसऱ्या दिवशीच भारताचा पराभव निश्चित असल्याचं दिसत आहे. दुसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा प्रतिका रावल नाबाद 43 आणि स्नेह राणा नाबाद 14 धावांवर खेळत आहे.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 125 धावांची आघाडी घेतली होती. खरं तर हे आव्हान मोडून काढणं डोकेदुखी होती. त्यात भारताच्या आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. स्मृती मंधाना दुसऱ्या डावातही काही खास करू शकली नाही. स्मृती मंधाना 2 चेंडूत 2 धावा करून डार्सी ब्राउनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाली. त्यानंतर शफाली वर्माही 5 धावा करून तंबूत परतली. प्रतिका रावलने एका बाजूने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या बाजूने तिला फलंदाजांची हवी तशी साथ मिळाली नाही. जेमिमा रॉड्रिग्स 14, कर्णधार हरमनप्रीत कौर 11, दीप्ती शर्मा 9 आणि ऋचा घोषला खातंही खोलता आलं नाही. लुसी हॅमिल्टनने 3, एनाबेल सुथरलँडने 2 आमि डार्सी ब्राउनने 1 विकेट काढली.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात एनाबेल सुथरलँडने जबरदस्त खेळी केली. तिने 171 चेंडूंचा सामना केला आणि 17 चौकारांच्या मदतीने 129 धावा केल्या. तिच्या झुंजार खेळीमुळे टीम इंडिया पिछाडीवर गेली. तर एलिस पेनीने 76 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त एकही साजेशी कामगिरी करू शकला नाही. संघाला पहिल्या डावात 125 धावांची आघाडी मिळाली. भारताकडून पहिल्या डावात सायली सातघरेने 4, क्रांती गौडने 2, दीप्ती शर्माने 2, स्नेह राणाने 1 आणि शफाली वर्माने 1 विकेट काढली.

Follow Us
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
Prasad Lad | रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला मोठा सस्पेन्स
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; वर्धापन दिनी ठाकरे-शिंदे काय बोलणार?
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील निवसस्थानी... राजकारणातील हालचालींना वेग
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी..
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी दिली; आता अभिनेत्री...