AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDW vs AUSW : कसोटी सामन्याचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर, जेमिमाची अर्धशतकी खेळी

भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकमेव कसोटी सामना होत आहे. या सामन्यातील पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिला. पहिल्या दिवशी काय घडलं ते जाणून घ्या

INDW vs AUSW : कसोटी सामन्याचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर, जेमिमाची अर्धशतकी खेळी
INDW vs AUSW : कसोटी सामन्याचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर, जेमिमाची अर्धशतकी खेळीImage Credit source: BCCI Women Twitter
| Updated on: Mar 06, 2026 | 8:13 PM
Share

भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी20 मालिका जिंकली आणि वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियकडून व्हाईटवॉश मिळाला. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यात एकमेव कसोटी सामना होत आहे. या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य होता असं म्हंटलं तर वागवं ठरणार नाही. कारण भारताचा पहिल्या दिवसाचा खेळ हा 198 धावांवर आटोपला. जेमिमा रॉड्रिग्स वगळता एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकलं नाही. स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा ही जोडी मैदानात उतरली होती. पण संघाच्या 18 धावा असताना स्मृती मंधाना बाद झाली. तिने फक्त 3 धावा केल्या आणि लुसी हॅमिल्टनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाली. शफाली वर्माही फार काही तग धरू शकली नाही. 35 धावा करून बाद झाली. प्रतिका रावलही 43 चेंडूंचा सामना करत 18 धावांवर बाद झाली.

भारताकडून जेमिमा रॉड्रिग्सने 84 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 52 धावांची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला 198 धावांपर्यंत मजल मारता आली. हरमनप्रीत कौर 19, दीप्ती शर्मा 7, ऋचा घोष 11, स्नेह राणा 5, सायली सातघरे 7 आणि क्रांती गौड 1 धाव करून तंबूत परतले. तर काश्वी गौतमने 54 चेंडूत नाबाद 34 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून एनाबेल सुथरलँडने भेदक गोलंदाजी केली. तिने 17 षटकात 46 धावा देत 4 गडी बाद केले. तर लुसी हॅमल्टनने 3, डार्सी ब्राऊनने 2 आणि एशले गार्डनरने 1 गडी बाद केला.

भारताने पहिल्या डावात केलेल्या 198 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरूवात काही चांगली झाली नाही. अवघ्या 2 धावा असताना जॉर्जिया वोल तंबूत परतली. फोइबी लिचफिल्ड 9 धावांवर तंबूत परतली. तर एलिसा हिलीचा खेळ 13 धावांवर आटोपला. एलिसा पेरी नाबाद 43 आणि एनाबेल सुथरलँड नाबाद 20 धावांवर खेळत आहे. भारताकडून सायली सातघरेने 2 आणि क्रांती गौडने 1 विकेट काढली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 3 गडी बाद 96 धावा केल्या आहे. अजूनही भारताकडे 102 धावांची आघाडी आहे. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे फलंदाज झटपट बाद करण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे.

Follow Us
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?