AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाला जय महाराष्ट्र.. ओमराजे निंबाळकर यांची पहिली प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरेंचे नाव घेत..

Omraje Nimbalkar first reaction : ओमराजे निंबाळकर यांनी पक्षांतरानंतर पहिल्यांदाच मोठी प्रतिक्रिया दिली. यादरम्यान त्यांनी अनेक गोष्टींवर खुलासा केला. शिंदेची साथ दिल्यानंतर सर्व गोष्टींवर पहिल्यांदाच खासदार ओमराजे निंबाळकर बोलताना दिसले. त्यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या.

ठाकरे गटाला जय महाराष्ट्र.. ओमराजे निंबाळकर यांची पहिली प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरेंचे नाव घेत..
Omraje Nimbalkar
| Updated on: Jun 19, 2026 | 1:50 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आहेत. मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना बसला. ठाकरे गटाकडून आपल्या खासदारांकरिता व्हिप जारी करण्यात आले. मात्र, या 6 खासदारांनी या व्हिपला कोणताही प्रतिसाद दिला नाही. हेच नाही तर ते बैठकीला अनुपस्थितीत राहिले. ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गटासोबत अनेक वर्षांपासून एकनिष्ठ आहेत. मात्र, त्यांनी आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडून थेट एकनाथ शिंदे यांचा हात पकडला आहे. ओमराजे निंबाळकर यांचा हा निर्णय अनेकांना अजिबात आवडला नाही. अनेकांनी थेट सोशल मीडियावर त्यांना अनफॉलो करण्यास सुरूवात केली. यादरम्यानच आता पक्षांतराच्या मुद्द्यात पहिली मोठी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी दिली. ओमराजे निंबाळकर यांनी राजकीय भूमिका 20 जूनला जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी आता पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ओमराजे निंबाळकर यांनी बंडखोरीनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हटले की, राजकीय अस्तित्वाचं संकट समोर होत. शिवाय विकासनिधीचा अभाव, यासारखी कारणे आहेतच. मी मोठ्या धर्म संकटात आहे. निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा पण राजकीयदृष्ट्या योग्य आहे. भावनिक विचार केला तर चुकीचे वाटते. पण राजकीयदृष्टीने बघितले तर तेच योग्य वाटते.

माझ्याकडे निष्ठा तर समोरच्यांकडे सत्ता आहे. सत्ता आणि निधी नसल्याने लोकांची कामे करता येत नव्हती. पक्षांतरासाठी पैसे घेतल्याचा, वाय प्लस सुरक्षा दिल्याच्या चर्चा खोट्या आहेत. हा निर्णय केवळ मतदारांच्या विकासासी घेतला आहे. आरोग्याच्या कारणामुळे उद्धव ठाकरेंना फिरणे शक्य नाही, पण आदित्य ठाकरेंनी फिरायला हवं होतं, असेही ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले.

खासदार ओमराजे निंबाळकरबद्दल आमदार कैलास पाटील भावनिक झाले. त्यांनी म्हटले की, खासदार ओमराजेंना सोडून पहिलाच शिवसेनेचा वर्धापन दिन. प्रत्येक वर्षी आम्ही दोघेजण वर्धापन दिनासाठी बरोबर जात होतो. मात्र, ते आज माझ्याबरोबर नाहीत हे माझ्यासाठी वेदनादायी आहे. माझी अपेक्षा आहे की, पहिल्याप्रमाणे शिवसेना एकसंघ राहावी.  मिळून काम केल्यानंतर एखादा मित्र जर बरोबर नसेल तर वाईट वाटतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Follow Us
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...