AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याची जोरदार चर्चा… ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया काय? ट्विट व्हायरल

शिवसेना पक्षात मोठी फुट निर्माण होत असून तब्बल 6 खासदार बंडखोरी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यादरम्यानच ओमराजे निंबाळकर यांचेही नाव त्यात आहे. ओमराजे निंबाळकर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. ओमराजे निंबाळकर यांची एक पोस्ट सोशल मीडियावर यादरम्यान शेअर केली.

ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याची जोरदार चर्चा... ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया काय? ट्विट व्हायरल
Omraje Nimbalkar
| Updated on: Jun 17, 2026 | 10:41 AM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटणार असल्याची माहिती आहे. हे सर्व खासदार दिल्लीत आहेत. काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजस्थानमध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. हे खासदार वेगळा गट निर्माण करणार आहेत. तसे पत्र दिले जाईल. एकनाथ शिंदे यांनी या 6 खासदारांना काही आश्वासन दिल्याचे कळतंय. 6 खासदार शिवसेना शिंदे गटाच्या गळ्याला लागली असून एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. यादरम्यान संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांच्याकडून दिल्लीत पत्रकार परिषद घेतली जाईल. 6 खासदारांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याकरिता शिवसेना शिंदे गटाकडून मेलच्या माध्यमातून व्हिप जारी करण्यात आले. मतदार संघात जास्तीत जास्त निधी देण्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी या खासदारांना दिल्याची माहिती आहे. शिवसेना ठाकरे गट सोडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात दाखल होणाऱ्या खासदारांची नावेही पुढे आलीत. त्यात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याही नावाचा समावेश आहे.

ओमराजे निंबाळकर दिल्लीत असल्याची माहिती मिळतंय. ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गटाला सोडून थेट शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार आहेत. बंडखोरीदरम्यानच आता ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गटासोबत गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. यादरम्यानच ते ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत असल्याची चर्चा आहे.

बंडखोरीच्या चर्चेदरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी पोस्ट शेअर केली. त्यांनी ही पोस्ट राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेअर केली. ओमराजे निंबाळकर यांच्या पोस्टमध्ये लिहिण्यात आले की, स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन ..! युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज घडले, वाढले आणि त्यांचे ‘निश्चयाचा महामेरू । बहुता जनांसी आधारू । श्रीमंत योगी।’ असे वर्णन होऊ लागले ती सारी कुणाची पुण्याई ध्येयवेड्या आईची, निराग्रही मातेची आणि वीरमाता, माँसाहेब जिजाऊंची!

लोककल्याणकारी अशा स्वराज्याच्या निर्मितीचे ध्येय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रूजवण्याचे कार्य जिजाऊंनी केले. कणखर नेतृत्व, अचूक निर्णयक्षमता, धैर्य, नीतीमूल्ये आणि वीरतेचा उत्तम आदर्श त्यांनी घालून दिला. त्या एक आदर्श माता होत्या. त्यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन ..! आता ओमराजे निंबाळकर यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं