AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

16 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन पोलिसांना महिनाभर चकवा, हनी ट्रॅपच्या माध्यमातून नराधमाला बेड्या

अल्पवयीन मुलीवर बलत्कार करून फरार झालेल्या वासनांध आरोपीला हनी ट्रॅप लावून अटक करण्यात तुळींज पोलिसांना यश आले आहे. सुरज सारसद असे आरोपीचे नाव असून तो 24 वर्षांचा आहे.

16 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन पोलिसांना महिनाभर चकवा, हनी ट्रॅपच्या माध्यमातून नराधमाला बेड्या
16 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन पोलिसांना महिनाभर चकवा, हनी ट्रॅपच्या माध्यमातून नराधमाला बेड्या
| Edited By: Chetan Patil | Updated on: Sep 24, 2021 | 7:33 PM
Share

नालासोपारा (पालघर) : अल्पवयीन मुलीवर बलत्कार करून फरार झालेल्या वासनांध आरोपीला हनी ट्रॅप लावून अटक करण्यात तुळींज पोलिसांना यश आले आहे. सुरज सारसद असे आरोपीचे नाव असून तो 24 वर्षांचा आहे. आरोपीने पोलिसांना खूप चकवा दिला. पण अखेर हनी ट्रॅपच्या माध्यमातून तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी आरोपीला घटनेनंतर जवळपास एक महिन्यांनी बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

आरोपा सुरज सारसद हा 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एक महिन्यांपूर्वी बलात्कार करुन फरार झाला होता. याबाबत तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच पोलिसांकडून आरोपीचा शोध घेणे सुरु होते. विशेष म्हणजे आरोपी इतका चालाख होता की तो वारंवार आपला मोबाईल नंबर बदलत होता. तसेच तो वेळोवेळी जागा बदलत फिरत होता. त्यामुळे त्याला पकडणं हे पोलिसांसमोर एक आव्हान बनलं होतं. पण अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.

तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात, पोलीस नायक जावेद तडवी, मध्यवर्ती गुन्हे शाखेचे कर्मचारी पोलीस नायक राजाराम काळे यांची स्वतंत्र टीम आरोपीच्या शोधासाठी नियुक्त केली होती. ही टीम दिवसरात्र आरोपीला पकडण्यासाठी झटत होती.

पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं?

तापासा दरम्यान पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली. एका गुप्त बातमीदाराने आरोपीबाबत महत्त्वाची माहिती दिली. आरोपी जरी मोबाईल नंबर बदलत असला तरी त्याचा व्हाट्सअॅप नंबर हा सुरु आहे, अशी माहिती गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली. आरोपीची गुन्हे करण्याची प्रक्रिया माहीत असल्याने एका पोलीस महिला मित्रच्या माध्यमातून हनी ट्रॅप लावून, काल (23 सप्टेंबर) ठाणे येुथील आनंद नगर येथे आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीला पकडण्यासाठी पीएसआय मल्हार थोरात यांच्या टीमने महिला पोलीस मित्रासोबत अक्षरश: बस, रिक्षा, पायी प्रवास करुन आरोपीपर्यंत पोहचले आहेत. एक गुन्हा करून, दुसऱ्या गुन्ह्याच्या तयारीत असताना आरोपीच्या मुसक्या आवळल्याने पोलिसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त होत आहे.

राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ

राज्यात बलात्काराच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. राज्याची राजधानी असलेल्या मुबंई शहराच्या अवघ्या काही अंतरावर असलेल्या डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर 31 जणांकडून सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पण या घटनेमुळे महिला अत्याचाराच्या घटनांवर आळा घालण्यासाठी काहीतरी कठोर पाऊल उचलण्याची गरज असल्याचं अधोरेखित केलं आहे.

महाबळेश्वरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलत्कार

दुसरीकडे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सागर उर्फ आबा हनुमंत गायकवाड (वय -30 वर्ष) आणि आशुतोष मोहन बिरामणे (रा. महाबळेश्वर) यांना ताब्यात घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

शिवसेना नेत्याची दोन मुलं

या दोघांना सातारा येथील जिल्हा विशेष सत्र न्यायालयाकडून 27 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर गुरुवारी या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये महाबळेश्वर नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते डी. एम. बावळेकर यांचे दोन सुपुत्र सनी बावळेकर आणि योगेश बावळेकर यांचादेखील समावेश असल्यामुळे महाबळेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपीचा पोलीस ठाण्यात गळफास, अमरावती पोलिसात खळबळ

साहिल खानला अटक करा, बॉडी बिल्डर मनोज पाटीलची समर्थकांसह पोलिस स्टेशनला धडक

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ