‘तो’ अपघात नाही, हत्याच ! अल्पवयीन प्रेयसीला पळवून आणलं, ट्रेनमध्ये 10 जणांनी संपवलं

| Updated on: Jul 25, 2021 | 4:23 PM

उत्तर प्रदेशमधून अल्पवयीन प्रेयसीसोबत पळून आलेल्या तरुणाला त्याच्या प्रेयसीच्या नातेवाईकांनीच ट्रेनमधून ढकलल्याची माहिती समोर आली आहे.

तो अपघात नाही, हत्याच ! अल्पवयीन प्रेयसीला पळवून आणलं, ट्रेनमध्ये 10 जणांनी संपवलं
प्रेमाला कुटुंबियांचा विरोध, अल्पवयीन मुलीला घेऊन मुंबईत दाखल, पण तरुणासोबत जे घडलं त्याने अनेकांचं मन हेलावलं
Follow us on

कल्याण (ठाणे) : उत्तर प्रदेशमधून अल्पवयीन प्रेयसीसोबत पळून आलेल्या तरुणाला त्याच्या प्रेयसीच्या नातेवाईकांनीच ट्रेनमधून ढकलल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला होता. या तरुणाचं नाव साहिल हाश्मी असं होतं. मृतक तरुणाने अल्पवयीन प्रेयसीला उत्तर प्रदेशहून कल्याणला आणलं. मात्र ज्या ट्रेनमध्ये साहिल हाश्मी आपल्या प्रेयसीसोबत बसला होता त्याच ट्रेनमध्ये मुलीचे नातेवाईक मुलीच्या शोधासाठी चढले होते. साहिलला पाहून संतापलेल्या अल्पवयीन मुलीच्या भावाने साहिलला धक्का दिल्याने कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकादरम्यान चालत्या ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. अखेर एक महिन्यानंतर डोंबिवली जीआरपीने या प्रकरणी 10 जणांना अटक केली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

उत्तर प्रदेशातील भदोईहून साहिल हाश्मी हा तरुण 18 जून रोजी आपल्या गावातील एका अल्पवयीन प्रेयसी घेऊन मुंबईकडे येण्यासाठी निघाला. साहिल आणि त्याची अल्पवयीन प्रेयसी हे कोणत्या ट्रेनमध्ये आहेत, ते कुठे चालले आहेत, याची खबर मुलीच्या नातेवाईकांना लागली होती. मुलीचे काही नातेवाईक अंबरनाथ येथे राहतात. 19 जून रोजी अंबरनाथहून मुलीचे काही नातेवाईक कल्याण स्थानकात पोहचले.

मुलीच्या भावाने साहीलला ट्रेनखाली ढकललं

मुलीचा भाऊ हा कासिम आणि दोन तरुण त्या ट्रेनमध्ये चढले. ट्रेन सुरु होताच अल्पवयीन मुलीसह साहिलला पाहून मुलीचे नातेवाईक संतापले. धावत्या ट्रेनमध्ये साहिल आणि मुलीच्या नातेवाईकात वाद झाला. या वादात साहिल धावत्या ट्रेनमधून खाली पडला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान पाच दिवसांनी साहिलचा मृत्यू झाला.

पोलिसांची प्रतिक्रिया

या प्रकरणाचा तपास डोंबिवली जीआरपी करत होते. या प्रकरणात डोंबिवली जीआरपीने 11 जणांना ताब्यात घेतले.
डोंबिवली जीआरपीचे अधिकारी मुकेश ढगे यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली. मुलीच्या एका नातेवाईकाचा धावत्या ट्रेनमध्ये साहिलसोबत वाद झाला. या वादादरम्यान मुलीच्या भावाने साहिलला धक्का दिला. त्यामुळे तो ट्रेनखाली पडला. या प्रकरणी 10 जणांना अटक केली आहे. एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. अटक आरोपीमध्ये काही जण ट्रेनमध्ये होते. तर काही जण कल्याण तर काही जण ठाणे रेल्वे स्थानकात थांबले होते. या सगळ्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या समावेश आहे, असं मुकेश ढगे यांनी सांगितलं.

अटक आरोपींची नावे

शाबीर हाश्मी, काशिम हाश्मी, गुलाम अली हाश्मी, शाहिद हाश्मी, रुस्तमअली हाश्मी, तस्लीम हाश्मी, अब्दुल्ला हाश्मी, फिरोज हाश्मी, रियाज मन्सुरी, इब्राहीम हाश्मी अशी आरोपींची नावे आहेत. साहिल हाश्मीच्या मृत्यूनंतर एक महिन्यांनी हे प्रकरण उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस तपासात आणखी काय निष्पन्न होते हे नंतरच कळणार आहे.

संबंधित बातमी : प्रेम केलं, अल्पवयीन मुलीला पळवून आणलं, पण अखेर करुण अंत, तरुणाची मन हेलावून टाकणारी कहाणी