AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेयसीला खुश करण्यासाठी चित्रपट लेखकाचा ‘गोलमाल’, तुरुंगात रवानगी

आरोपी शुभम शाहूने बल्क मेसेज सुविधांचा वापर करत ट्रॅव्हल कंपनी, सोनाराला गंडवले

प्रेयसीला खुश करण्यासाठी चित्रपट लेखकाचा 'गोलमाल', तुरुंगात रवानगी
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Dec 14, 2020 | 3:48 PM
Share

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेल्या तरुणाला ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ झाली. प्रेयसीला खुश करण्यासाठी तरुणाने विमानाची तिकीटं, फाईव्ह स्टार हॉटेलचे बुकिंग, सोन्याच्या दोन बांगड्या अशी पैशांची उधळण केली. मात्र बॉलिवूडमध्ये चित्रपट लेखक म्हणून कार्यरत तरुणावर आता तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली. (Mumbai Film Writer Fraud for Girlfriend lands in jail)

देशात कोरोनाचे साईड इफेक्ट हळूहळू समोर येत आहेत. मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे बंद किंवा प्रभावित झाले आहेत, तर कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. त्याचबरोबर मोठ्या संख्येने नागरिक रोजगारही गमावून बसले आहेत. मुंबईत बॉलिवूडमध्ये फिल्म रायटिंगचे काम करणारा एक तरुण कोरोनामुळे नोकरी गमावून बसला होता. नोकरी नसल्याने त्याच्याकडे पैसे नव्हते. म्हणून त्याने आपल्या प्रेयसीला आकर्षित करण्यासाठी जो मार्ग पत्करला, त्यामुळे त्याला आता गजाआड व्हावे लागले.

28 वर्षांचा शुभम पितांबर शाहू… ओशिविरा आदर्श नगरमधून शनिवारी त्याला अटक करण्यात आली. अटकेचं कारण ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. कारण शाहू लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाला होता. मुलुंडमध्ये राहणाऱ्या यूट्युबर प्रेयसीला खुश करण्यासाठी त्याने एका टूर कंपनीच्या माध्यमातून जयपूरला जाणारी विमानाची दोन तिकिटं आणि एक आठवड्यासाठी फाईव्ह स्टार हॉटेलही बुक केले होते. त्याचबरोबर प्रेयसीसाठी सोन्याच्या दोन बांगड्याही त्याने खरेदी केल्या होत्या. ही सर्व खरेदी त्याने चुकीच्या पद्धतीने केल्याचं उघड झालं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपी शाहूने जेव्हा ट्रॅव्हल्सचे तिकीट बुक केले, तेव्हा त्याने पैसे न देता ट्रॅव्हल्स कंपनीचा बँक अकाउंट नंबर मागून घेतला. खात्यात NEFT च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्याचे त्याने सांगितले. काही मिनिटात ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकिणीच्या मोबाईल नंबरवर कोटक बँकेचा मेसेजही आला. मात्र हा मेसेज कुठल्या बँकेचा नसून तो आरोपी शाहूने स्वतः बल्क मेसेज सुविधांचा वापर करत पाठवला होता. विश्वास बसावा म्हणून त्याने शंभर रुपये आपल्या खात्यातून पाठवून पैसे पाठवण्याची पोचपावतीही सेंड केली होती. असाच त्याने ज्वेलरलाही चुना लावला. ट्रॅव्हल्स कंपनी आणि इतरांनी आपापला बँक खात्यात बॅलेन्स चेक केला तर त्यांच्या खात्यात पैसेच आले नव्हते. म्हणून ट्रॅव्हल्स कंपनीची मालकिणीने पोलिसात गुन्हा दाखल केला.

या प्रकरणात टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकिणीने ओशिवरा पोलीस ठाण्यात आरोपी शुभम पितांबर शाहू याच्याविरोधात कलम 420 467 465, IT 66 C आणि D प्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली. या घटनेमुळे एकीकडे आरोपी तुरुंगात पोहोचला तर दुसरीकडे त्याची प्रेयसी जिच्यासाठी त्याने हे सर्व केलं, तिचीही नाराजी ओढवली आहे. त्यामुळे आधीच गोत्यात असताना शुभमचा पाय आणखी खोलात गेला.

संबंधित बातम्या :

अनैतिक संबधाला अडथळा ठरणाऱ्या युवकाचा खून, पोलिसांनी एका वर्षानंतर आवळल्या आरोपीच्या मुसक्या

फेक ‘टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अटक केलेले ‘ते’ 13 जण कोण?

(Mumbai Film Writer Fraud for Girlfriend lands in jail)

Follow Us
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी