TRP Scam | फेक ‘टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अटक केलेले ‘ते’ 13 जण कोण?

अटक करण्यात आलेल्या 13 जणांची नावं 'टीव्ही 9 मराठी'च्या हाती लागली आहेत. (BARC Fake TRP Racket Republic Channel 13 People  Arrest)

TRP Scam | फेक ‘टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अटक केलेले 'ते' 13 जण कोण?
Follow us
| Updated on: Dec 13, 2020 | 3:49 PM

मुंबई : फेक ‘टीआरपी घोटाळा’ (Fake TRP scam) प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे एक मोठी कारवाई करण्यात आली. रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानी यांना आज (13 डिसेंबर) अटक करण्यात आली. दरम्यान फेक ‘टीआरपी घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 13 जणांची नावं ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहेत. (BARC Fake TRP Racket Republic Channel 13 People  Arrest)

टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी यापूर्वी विकास खानचंदानी यांना समन्स पाठवण्यात आला. त्यानंतर त्यांना गुन्हे शाखेत बोलवून त्यांची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीनंतर विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून गेल्या अनेक महिन्यांपासून टीआरपी घोटाळ्याप्रकरणी तपास सुरु आहे.

आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची नाव

आरोपींची नाव – अटकेची तारीख

1) विशाल वेद भंडारी – 7 ऑक्टोबर 2) बोंम्पेल्लीराव नारायण मिस्त्री – 7 ऑक्टोबर 3) शिरीष सतीश पट्टण शेट्टी – 8 ऑक्टोबर 4) नारायण नंदकिशोर शर्मा – 8 ऑक्टोबर 5) विनय राजेंद्र त्रिपाठी – 12 ऑक्टोबर 6) उमेश चंद्रकांत मिश्रा 7) रामजी दुधनाथ शर्मा 8) दिनेश पन्नालाल विश्वकर्मा 9) हरीश कमलाकर पाटील 10) अभिषेक कोलवडे 11) आशिष अबीदूर चौधरी – 28 ऑक्टोबर 12) घनश्याम सिंग 13) विकास खानचंदानी – 13 डिसेंबर

मुंबई पोलिसांनी रिपब्लिक चॅनेलचा टीआरपी घोटाळा उघडकीस आणला होता. बॅरोमिटरमध्ये फेरफार करून टीआरपी आकडे वाढवले जात होते.याबाबत मुंबई पोलिसांनी कारवाई करून जणांना अटक केली होती. या व्यक्तींच्या चौकशीत आरोपींनी रिपब्लिक चॅनेल पैसे देऊन लोकांना आपलं चॅनेल बघायला भाग पाडत असल्याचं उघडकीस आलं होतं.

काय आहे प्रकरण?

“रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी काही लोकांना पैसे देऊन आपल्या घरात दिवसभर हे चॅनेल सुरु ठेवण्यास सांगण्यात आले होते. यासाठी प्रत्येकी 400 ते 500 रुपये दिले जात असत. त्यामुळे चॅनेलच्या टीआरपीत मोठी वाढ दिसून आली होती. याचा थेट फायदा जाहिराती मिळवण्यासाठी होत असे. त्यामुळे आता या टीआरपीच्या आधारे संबंधित चॅनेल्सला मिळालेल्या जाहिरातींचीही चौकशी केली जाईल. तसेच हे जाहिरातदारही या रॅकेटमध्ये सहभागी होते का, याचा तपास केला जाईल” अशी माहिती परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

टीआरपी म्हणजे काय?

टीआरपीचा अर्थ टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (Television Rating Point ) असा होतो. यावरुन प्रेक्षक कोणते टेलिव्हिजन चॅनेल जास्त पाहतात, हे ठरवले जाते. टेलिव्हिजन विश्वात कोणती मालिका किंवा वृत्तवाहिन्यांवरील कोणता शो सर्वात जास्त लोकप्रिय आहे, याचे मोजमापही टीआरपीच्या आधारेच केले जाते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात जाहिराती मिळवण्यासाठी टीआरपी रेटिंग अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. (BARC Fake TRP Racket Republic Channel 13 People  Arrest)

संबंधित बातम्या : 

TRP scam | मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, रिपब्लिक चॅनेलच्या सीईओंना अटक

TRP Scam | ‘रिपब्लिक’ची मागणी अमान्य, अर्णबच्या चौकशीनंतर अटकेचा निर्णय घ्या, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.