AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला डब्यात एकटी असल्याची संधी साधली, मग धावत्या लोकलमध्ये तरुणीवर…

परीक्षा देण्यासाठी तरुणी चालली होती. यासाठी तिने मध्य रेल्वेवरुन हार्बर लोकल पकडली. पण परीक्षा केंद्रावर पोहचण्याआधीच तरुणीसोबत भयंकर घडलं.

महिला डब्यात एकटी असल्याची संधी साधली, मग धावत्या लोकलमध्ये तरुणीवर...
मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणीवर अत्याचार
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jun 15, 2023 | 10:53 AM
Share

मुंबई : मुंबईत एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. धावत्या लोकलमध्येच एका नराधमाने तरुणीची अब्रू लुटल्याची घटना बुधवारी घडली. सीएसएमटी ते मस्जिद बंदर स्थानकादरम्यान ही गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आठ तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्यांना बेड्या ठोकल्या. अटक आरोपी हा रोजंदारी कामगार आहे. आरोपीविरुद्ध भादंविच्या विविध कलमांखाली बलात्कारासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

डब्यात कुणी नसल्याची संधी साधत तरुणीवर अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर 20 वर्षीय तरुणी गिरगाव परिसरातील रहिवासी असून, ती नवी मुंबईतील बेलापूर येथे बुधवारी परीक्षा देण्यासाठी चालली होती. यासाठी तिने सकाळी सीएसएमटी येथून हार्बर लोकल पकडली. डब्यात कुणीच नव्हते. यावेळी आरोपी महिला डब्यात शिरला. तरुणी एकटी असल्याची संधी साधत त्याने तिच्यावर अत्याचार केला.

सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला अटक

आरोपीने सकाळी 7:26 च्या सुमारास सीएसएमटी आणि मस्जिद स्थानकांदरम्यान तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तरुणीने लोकलमधील अलार्म वाजवताच आरोपी मस्जिद स्टेशनवर उतरला. तरुणीने जीआरपीकडे तक्रार दाखल केली, त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध या गुन्हा नोंदवण्यात आला. जीआरपी आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ)च्या पथकांनी मस्जिद बंदर स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला. त्यानंतर त्याची ओळख पटली आणि दुपारी 4 वाजता त्याला पकडण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...