जुना वाद मिटवण्यासाठी बिल्डरसोबत बैठक झाली, मग घरी परतत असतानाच खदान मालकाला वाटेत गाठलं अन्…

बदलापुरात भररस्त्यात हल्ल्याच्या घटना घडत आहेत. एका खदान मालकावर हल्ला केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

जुना वाद मिटवण्यासाठी बिल्डरसोबत बैठक झाली, मग घरी परतत असतानाच खदान मालकाला वाटेत गाठलं अन्...
बदलापूरमध्ये खदान मालकावर हल्लाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 10:24 AM

बदलापूर : बदलापुरात एका खदान मालकावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. यात बनोटे हे जखमी झाल्यानं त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात सुरू आहेत. बिल्डर विश्वनाथ पनवेलकर यांनी हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप खदान मालकाने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नासह कट रचण्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान विश्वनाथ पनवेलकर यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावत, हा हल्ला खदान मालकाने स्वतःच करवून घेतल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसंच या खदान मालकावर अब्रुनुकसानीचा दावा टाकणार असल्याचा इशाराही पनवेलकर यांनी दिला आहे.

खदान मालक आणि बिल्डरमध्ये जुना वाद

महेश बनोटे असं खदान मालकाचं नाव असून त्यांची वांगणी जवळच्या शीळ गावात खदान आहे. ही खदान बिल्डर विश्वनाथ पनवेलकर यांना भाड्याने देण्यात आली होती. मात्र त्यांच्यात वाद झाल्यानं सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. यानंतर बनोटे यांच्याशी संबंधित एका महिलेने विश्वनाथ पनवेलकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. मात्र त्या आरोपात पनवेलकर यांना पोलिसांनी क्लिनचीट दिली होती. यानंतर जुने वाद मिटवण्यासाठी मंगळवारी पनवेलकर यांच्या वतीनं काही जण आणि महेश बनोटे, तसंच त्यांचे सहकारी यांच्यात बैठक झाली. मात्र त्यातून काहीच फलित निघालं नाही.

बिल्डरसोबत बैठक निष्फळ ठरल्यानंतर भररस्त्यात हल्ला

बैठकीनंतर रात्री 8.45 च्या सुमारास बनोटे हे एका सहकाऱ्यासह बदलापूर पश्चिमेच्या भारत कॉलेज परिसरात आले असता, त्यांच्यावर 5 ते 6 जणांनी लोखंडी रॉड आणि चॉपरने हल्ला केला. यात बनोटे हे जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात सुरू आहेत. आपल्यावर झालेला हल्ला हा बिल्डर विश्वनाथ पनवेलकर यांनीच घडवून आणल्याचा आरोप महेश बनोटे यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

बिल्डरसह 5 ते 6 जणांविरोधात गुन्हा दाखल

बनोटे यांच्या आरोपानुसार बदलापूर पश्चिम पोलिसांनी विश्वनाथ पनवेलकर यांच्यासह 5 ते 6 जणांविरोधात हत्येचा प्रयत्न, कट रचणे यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात सध्या प्रत्यक्ष हल्लेखोरांचा तपास सुरू असून, बनोटे यांच्याशी बैठक करण्यासाठी जे लोकं आले होते त्यांची चौकशी सुरु आहे. भविष्यात पनवेलकर यांना चौकशीसाठी बोलावलं जाईल, अशी माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली आहे.

बिल्डरकडून अब्रू नुकसानीचा दावा करण्याचा इशारा

दरम्यान, या प्रकरणात ज्यांचं नाव घेतलं जातंय, त्या बिल्डर विश्वनाथ पनवेलकर यांना या आरोपांबाबत विचारलं असता, या हल्ल्याशी आपला काहीही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच हा हल्ला महेश बनोटे याने स्वतःच घडवून आणला असू शकतो, असा संशय त्यांनी व्यक्त केला. इतकंच नव्हे, तर महेश बनोटे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी उल्हासनगर परिमंडळ 4 मधील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी बदलापुरात दाखल झाले आहेत. तर क्राईम ब्रँचकडूनही या प्रकरणाचा समांतर तपास सुरू करण्यात आला आहे. त्यामुळं आता यातून नेमकं काय समोर येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
'मनोज जरांगे हे बालबुद्धी, त्यांची अवस्था एक दिवस...,' - आशीष देशमुख
'मनोज जरांगे हे बालबुद्धी, त्यांची अवस्था एक दिवस...,' - आशीष देशमुख.
WITT : Not An ERA Of War विषयावर सखोल चर्चा, भारताची भूमिका काय?
WITT : Not An ERA Of War विषयावर सखोल चर्चा, भारताची भूमिका काय?.
... म्हणून चीनवर भडकले ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट
... म्हणून चीनवर भडकले ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट.
भारत हा आशियातील महासत्ता अन् महान देश, टोनी ॲबॉट भारतावर भरभरून बोलले
भारत हा आशियातील महासत्ता अन् महान देश, टोनी ॲबॉट भारतावर भरभरून बोलले.
WITT : मोदी हे सामान्य नेते नाहीत तर..टोनी ॲबॉट यांच्याकडून गौरवोद्गार
WITT : मोदी हे सामान्य नेते नाहीत तर..टोनी ॲबॉट यांच्याकडून गौरवोद्गार.
WITT : भारत सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर... - बरुण दास
WITT : भारत सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर... - बरुण दास.
व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समीटचा २रा दिवस, बॉलिवूडच्या दिग्गजांची हजेरी
व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समीटचा २रा दिवस, बॉलिवूडच्या दिग्गजांची हजेरी.
प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांचा 'नक्षत्र पुरस्कारानं' गौरव
प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांचा 'नक्षत्र पुरस्कारानं' गौरव.
WITT : पुष्पा सुपरस्टार अल्लू अर्जुनला नक्षत्र सन्मान; म्हणाला...
WITT : पुष्पा सुपरस्टार अल्लू अर्जुनला नक्षत्र सन्मान; म्हणाला....
अम्मा 'ॲनिमल' पाहू नको... खुशबू सुंदर यांच्या मुली असं का म्हणाल्या?
अम्मा 'ॲनिमल' पाहू नको... खुशबू सुंदर यांच्या मुली असं का म्हणाल्या?.