ज्येष्ठ विचारवंत डॉ. कलबुर्गींच्या मारेकऱ्यांची ओळख पटली

ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गीं यांच्या मारेकऱ्याची ओळख पटली आहे. डॉ. कलबुर्गींच्या पत्नी उमादेवी आणि अन्य एका साक्षीदाराने दोन्ही आरोपींना ओळखले.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. कलबुर्गींच्या मारेकऱ्यांची ओळख पटली
Follow us
| Updated on: Jul 21, 2019 | 12:24 PM

बेळगाव : ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गीं यांच्या मारेकऱ्याची ओळख पटली आहे. डॉ. कलबुर्गींच्या पत्नी उमादेवी आणि अन्य एका साक्षीदाराने दोन्ही आरोपींना ओळखले. कर्नाटकमधील कल्याणनगर (धारवाड) येथे 30 ऑगस्ट 2015 रोजी त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कलबुर्गी यांच्यावर गणेश मिस्किने गोळ्या झाडल्या होत्या, तर प्रवीण प्रकाश चतुर हा दुचाकी चालवत असल्याचे एसआयटीच्या तपासात पुढे आले आहे.

संबंधित आरोपी धारवाड येथील मध्यवर्ती कारागृहात आहेत. त्यांची तहसीलदार प्रकाश कुदरी यांच्या उपस्थितीत ओळखपरेड घेण्यात आली. यावेळी कलबुर्गी यांच्या पत्नीने आरोपींना ओळखले. गौरी लंकेश यांच्या हत्येतील संशयितांचा कलबुर्गी हत्या प्रकरणातही सहभाग असल्याचा संशय होता. या संशयावरून त्यांची चौकशी केली असता काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत.

मेकॅनिक असलेल्या वासुदेव सूर्यवंशीने संबंधित दुचाकी चोरल्याचे स्पष्ट झाले आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या दुचाकीची दवणगेरेतून तर कलबुर्गी यांच्या हत्येसाठी हुबळीतून दुचाकी चोरण्यात आली होती. हुबळी येथील सबअर्बन पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीच्या घटनेची नोंदही आहे.

दरम्यान, मागील काही काळात कलबुर्गी यांच्यासह ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येने मोठी खळबळ माजली होती. न्यायालयाने देखील यावर चिंता व्यक्त केली होती. विशेष म्हणजे या सर्व हत्येंमध्ये काही जवळचा संबंध असल्याचा संशय आधीपासून व्यक्त केला जात होता. आता नव्याने आलेल्या माहितीनुसार गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्येसाठी वापरलेल्या दोन्ही दुचाकी चोरीच्या होत्या. आरोपी प्रवीण प्रकाश चतुर आणि गणेश मिस्किनने या दुचाकींचा वापर केला होता.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.