AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेती तस्करी थांबवताना महिला सिंघम वनरक्षकावर जीवघेणा हल्ला, ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न

पहाटे 4 वाजताच्या सुमारास वनरक्षक जयश्री राजगिरे या बेलगाव ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह सापळा रचून रेती तस्करी होत असलेल्या ठिकाणावर एका ट्रॅक्टरमध्ये बसून पोहोचल्या. यावेळी तिथून जाणाऱ्या दोन ट्रॅक्टरला त्यांनी अडविले, त्यातील एका ट्रॅक्टरने वनरक्षक जयश्री राजगिरे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर ट्रॅक्टर चालवून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला

रेती तस्करी थांबवताना महिला सिंघम वनरक्षकावर जीवघेणा हल्ला, ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न
भंडाऱ्यात महिला वनरक्षकावर हल्ल्याचा प्रयत्न
| Edited By: Anish Bendre | Updated on: Dec 31, 2021 | 12:07 PM
Share

तेजस मोहतुरे, टीव्ही9 मराठी, भंडारा : वन विभागाच्या हद्दीतून होणारी रेती तस्करी थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला सिंघम वनरक्षकावरच रेती तस्करांनी हल्ला केला. भंडारा जिल्ह्यातील वडेगावच्या महिला वनरक्षक जयश्री राजगिरे यांना ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पहाटेच्या सुमारास भंडारा वनपरिक्षेत्रातील वडेगाव (रीठी) येथे ही घटना घडली. यामुळे वन कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तस्करी करणाऱ्या दोघा भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

भंडारा वनपरिक्षेत्रात येणाऱ्या मांडवी नियत क्षेत्रातील वडेगाव बीटातील बेलगाव येथील वैनगंगा नदी पात्रालगत असलेल्या वन विभागाच्या गट क्रमांक 1/2 मधून रेती तस्कर मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी करत आहेत, अशी माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी वडगावच्या महिला वनरक्षक जयश्री राजगिरे यांना दिली.

नेमकं काय घडलं?

या माहितीवरून जयश्री राजगिरे यांनी बेलगाव ग्रामपंचायतच्या सरपंच रीना तुमसरे, उपसरपंच मनोज वडतकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष लक्ष्मण केवट आणि ग्रामपंचायत सदस्यांसह रेती तस्करीवर आळा घालण्या संदर्भात ग्रामपंचायतीत एक बैठक घेतली. त्यानंतर पहाटे 4 वाजताच्या सुमारास वनरक्षक जयश्री राजगिरे या बेलगाव ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह सापळा रचून रेती तस्करी होत असलेल्या ठिकाणावर एका ट्रॅक्टरमध्ये बसून पोहोचल्या.

लेडी सिंघमचे प्रसंगावधान

यावेळी तिथून जाणाऱ्या दोन ट्रॅक्टरला त्यांनी अडविले, त्यातील एका ट्रॅक्टरने वनरक्षक जयश्री राजगिरे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर ट्रॅक्टर चालवून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला, मात्र समयसूचकता दाखवत महिला वनरक्षक जयश्री राजगिरेसह ग्रामपंचायतचे पदाधिकारी ट्रॅक्टरच्या वाटेतून बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, दुसरा ट्रॅक्टर (क्रमांक एमएच 36 एल 5976 ) पकडण्यात वनरक्षक जयश्री राजगिरेसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना यश आले. या प्रकरणी वन विभागाच्या वतीने कारधा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी दोन भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश शालिक निंबारते (35) आणि शैलेश शालीक निंबारते (32) (रा. मंहनगाव) या दोन सख्ख्या भावांविरुद्ध कारणा पोलिसात भादंवी 253, 379, 511, 34 या कलमांच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

40 कोटींच्या संपत्तीचा मोह, बापलेकीने आईला संपवलं, हायप्रोफाईल मर्डर केसचा तीन दिवसात छडा

मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा पाठलाग करुन अश्लील वर्तन, वसईत टवाळखोराला स्थानिकांनी चोपला

शेतजमिनीच्या खरेदी-विक्रीवरून वाद; शेतशिवारात फेकून दिलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

Follow Us
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?